मुंबई, 23 जुलै : रिंकू राजगुरूची मुख्य भूमिका असलेल्या कागर या चित्रपटाची सध्या चित्रपटसृष्टीत उत्सुकता आहे. कारण, सोशल मीडियावर या चित्रपटातील गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, या व्हिडिओमध्ये रिंकूच्या दिलखेचक अदा पहायला मिळत आहेत. या व्हिडिओतून बऱ्याच काळानंतर रिंकू प्रेक्षकांसमोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे. तर ‘उदाहरणार्थ’ निर्मिती संस्थेच्या सुधीर कोलते आणि विकास हांडे यांची चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात रिंकूचा नायक कोण आहे, हे अजून गुलदस्त्यातच आहे. रिंकूचा नवा चित्रपट कधी येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. रिंकू नाचताना धमालही करत आहे. या गाण्याच्या चालीवरून चित्रपट कसा असेल याचा एक अंदाजही बांधता येईल. सैराट सिनेमामुळे रिंकू सुपरहिट झाली. मध्यंतरी तिनं दाक्षिणात्य सिनेमात काम केलं होतं. पण तो फारसा