बॉलिवूडचे बिंधास्त कपल अली फजल (Ali Fazal ) आणि रिता चड्ढा (Richa Chadha)ची प्रेमकहाणी पहिल्यादा मॅगझिन कव्हरच्या फोटोशूट दरम्यान समोर आली आहे.
बॉलिवूडमधील बिंधास्त कलाकार म्हणून अली फजल आणि ऋचा चड्ढा यांच्याकडे बघितलं जातं. अनेक कार्यक्रमांमध्ये ही जोडी सर्रास एकत्र दिसते. त्यामुळे चाहते त्यांच्या लग्नाबाबत उत्सूक आहेत.
2012 मध्ये फुकरे सिनेमात त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. 2017 मध्ये त्यांनी त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. (फोटो सौजन्य- ब्राइड्स टूडे)
दरम्यान सध्या ही जोडी ब्राइड्स टडेच्या 2020 च्या मॅगझीनमध्ये झळकत आहे. यामध्ये त्यांनी कव्हर फोटोशूट तर केलेच आहे पण त्याचबरोबर दोघांनी त्यांची लव्ह स्टोरी देखील सांगितली आहे. (फोटो सौजन्य- ब्राइड्स टूडे)
हे मॅगझिन कव्हर लग्नानंतरच्या स्वरूपात होते. पण लॉकडाऊनमुळे दोघांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले आहे. (फोटो सौजन्य- ब्राइड्स टूडे)
मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिचा अशी माहिती दिली आहे की, एकदा दोघेजण तिच्या घरी चॅपलिन मुव्ही पाहत होते. त्यावेळी अलीला झालेला आनंद पाहून रिचाच्या लक्षात आले की, त्या दोघांची पसंत मिळतीजुळती आहे. तेव्हा तिने अलीला म्हटले होते की, 'तू खूप छान आहेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे'. याचं उत्तर देण्यासाठी अलीने 3 महिन्याचा वेळ घेतला होता. (फोटो सौजन्य- ब्राइड्स टूडे)
अलीने रिचाला मालदीव याठिकाणी लग्नासाठी विचारल्याचा किस्सा देखील रिचाने यावेळी शेअर केला. (फोटो सौजन्य- ब्राइड्स टूडे)