JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / स्पोर्ट्स ब्रा आणि जॅकेटमध्ये Rhea Chakraborty चा सुपरहॉट अंदाज; VIDEO ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

स्पोर्ट्स ब्रा आणि जॅकेटमध्ये Rhea Chakraborty चा सुपरहॉट अंदाज; VIDEO ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री रिया चक्रवर्ती  (Rhea Chakraborty)  पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. अभिनेत्री सतत सार्वजनिक ठिकाणी दिसून येत आहे. सध्या अभिनेत्री आपल्या एका ग्लॅमरस व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. रियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या   (Sushant Singh Rajput)  मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती प्रचंड चर्चेत आली होती. सुशांत प्रकरणात या अभिनेत्रीवर अनेक आरोप लागले होते. दरम्यान बॉलिवूड ड्रग्स प्रकरण समोर आलं होतं. यामध्ये रियाला तुरुंगातसुद्धा जावं लागलं होतं. या सर्व प्रकरणानंतर अभिनेत्री सोशल मीडियावरून गायब झाली होती. मात्र आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. इतकंच नव्हे तर ती सतत आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहात आहे.

संबंधित बातम्या

नुकताच रिया चक्रवर्तीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती सुपरबोल्ड अंदाजात दिसून येत आहे. अभिनेत्रीनं नुकताच आपला नवा व्हिडीओ शूट केला आहे.. यामध्ये ती टिपिकल ऑफिस लूकमध्ये दिसून येत आहे. या लूकला बोल्ड टच देत अभिनेत्रीनं स्पोर्ट्स ब्रासोबत जॅकेट परिधान केला आहे. पिस्ता कलरच्या या ड्रेसमध्ये रिया चक्रवर्ती फारच बोल्ड दिसत आहे. अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करताच तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रियाचे चाहते या व्हिडिओला पसंत तर करतच आहेत शिवाय कमेंट्ससुद्धा करत आहेत. तसेच अभिनेत्री मोनिका डोगरानं या व्हिडीओवर कमेंट करत, ‘ब्यूटी’ असं म्हटलं आहे. (हे वाचा: ‘मंदिरात जाऊन, गरिबांना मदत करून, तुझं पाप कमी नाही होणार’, VIRAL … ) अभिनेत्री रिया चक्रवर्ती सतत सोशल मीडियावर ट्रोल होत असते. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीवर अनेक आरोप लागले होते. त्यांनतर सतत तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात केलं जातं. काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्ती एका मंदिरात दर्शन घेताना दिसून आली होती. इतकंच नव्हे तर याठिकाणी तिनं गरजूंना अन्नदानही केलं होतं. मात्र अभिनेत्री सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर आपली इमेज सुधारण्यासाठी हे सर्व करत असल्याचे आरोप तिच्यावर लागले होते. तसेच हे सर्व करून तुझं पाप कमी होणार नाही असं सुशांतच्या चाहत्यांनी कमेंट्स केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या