JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्री रिया चक्रवर्तीला बलात्कार आणि खुनाची धमकी, शेअर केला स्क्रीनशॉट

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला बलात्कार आणि खुनाची धमकी, शेअर केला स्क्रीनशॉट

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) सोशल मीडियावर खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिला काही धमक्या देखील सोशल मीडियावर मिळाल्या आहेत.

जाहिरात

यापूर्वी रिया चक्रवर्तीने या डायरीतील एक पान जारी केलं होतं. या पानात सुशांतने आभार सूची अशा विषयाखाली रियाच्या कुटुंबीयांचे आभार मानले होते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (Sushant Singh Rajput Suicide) सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या मृत्यूसाठी  अनेकांनी बॉलिवूडमधील नेपोटिझमला जबाबदार धरले आहे तर काहींनी त्याच्या जवळच्या लोकांना कारणीभूत ठरवले आहे. यामध्ये सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) सोशल मीडियावर खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सुशांतच्या आठवणीत तिने शेअर केलेल्या एका पोस्टवरून देखील तिला ट्रोल करण्यात आले होते. त्याचप्रमाणे तिला खुलेआम धमक्या मिळण्याचे सत्र देखील सुरूच होते.  मात्र आता या ट्रोलिंगला आणि धमक्यांना कंटाळून रिया चक्रवर्तीने एक पोस्ट केली आहे. सायबर सेलने यामध्ये लक्ष घालण्याची विनंती रियाने केली आहे. (हे वाचा- सुशांतच्या आत्महत्येचं दुबईतील डॉनशी कनेक्शन? भाजप खासदाराची CBI चौकशीची मागणी ) रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक इन्स्टा चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या युजरने तिचा बलात्कार आणि खून करण्याची धमकी दिली असल्याचा आरोप तिने या पोस्टच्या माध्यमातून केला आहे. तिला आलेल्या या मेसेजमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, ‘जर तु आत्महत्या नाही केलीस तर तुझा रेप आणि खून केला जाईल. मी त्याकरता लवकरच माणसं पाठवेन’.

ही पोस्ट शेअर करताना रियाने अशी माहिती दिली आहे की तिने यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार केली आहे. रियाने ही पोस्ट शेअर करताना असे म्हटले आहे की, ‘मला पैशांसाठी लालची बोलण्यात आलं तरी मी शांत होते, मला वाईट शिव्या देण्यात आल्या मी शांत होते, खुनी बोलण्यात आलं तरीही मी शांत होते. पण माझी शांतता तुम्हाला हे सांगण्याचा अधिकार कसा काय देते की तुम्ही माझा बलात्कार आणि खून कराल?’ रियाने या पोस्टमध्ये सायबर सेलला देखील टॅग केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या