रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आपण सुशांतबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबुल केलं आहे. काय आहे रियाचा इतिहास आणि आतापर्यंतचे अपडेट्स?
मुंबई पोलीसच सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास करू शकतात, असं म्हणत रिया चक्रवर्तीने बिहारमध्ये केस जायला विरोध केला आहे.
सुशांतबरोबर आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो, याची कबुली तिने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत दिली.
सुशांतच्या आत्महत्येनंतर आपल्याला बलात्कार आणि खुनाच्या धमक्याही आल्या. त्याबद्दल मुंबई पोलिसात तक्रार दाखल केल्याचं रियानं म्हटलं आहे.
सुशांतच्या वडिलांनी लावलेले सगळे आरोप खोटे असल्याचं सांगत रियाने या प्रकरणी मुंबई पोलिसांकडेच केस ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे.
बिहार सरकारने मात्र रियाच्या या याचिकेला विरोध करण्यासाठी मुकुल रोहतगींसारखे तगडे वकील सुप्रीम कोर्टात उभे केले आहेत.
सुशांतच्या आत्महत्येनंतर रियाचे महेश भट यांच्यासोबत काही फोटो व्हायरल झाले होते. ज्यामुळे ती वादच्या भोवऱ्यात सापडली होती.
रियाने सुशांतच्या खात्यातून 17 कोटी रुपये परस्पर वळवल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे.
रिया चक्रवर्ती तिचा सिनेमा जलेबी सिनेमाच्या रिलीजवेळी सुद्धा खूप चर्चेत राहिली होती. कारण होतं या सिनेमाचं पोस्टर ज्यावर रिया ट्रेनच्या खिडकीतून तिच्या सह-अभिनेत्याला किस करताना दिसली होती. ज्यावर मीम्स सुद्धा व्हायरल झाले होते.
सुशांतला वेडं ठरवून त्याचा पैसा हडप करण्याचा रियाचा डाव होता, असे गंभीर आरोप तिच्याविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी केले आहेत.
बिहार पोलिसांची एक टीम आता रियाला अटक करू शकते. अशी शक्यता असल्याने तिने सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणातील तपास करण्यासाठी बिहार पोलीस मुंबईत दाखल झाले. त्यानंतर चक्क रिक्षातून प्रवास करत ते सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या घरी पोहोचले .
सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही खळबळजनक आरोप केला आहे. रिया आपला छळ करत असल्याचं सुशांतने आपल्याला सांगितलं होतं, असं अंकिता लोखंडे म्हणाली होती. त्यानंतर बिहार पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे.
बिहार पोलिसांना सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांकडून सहकार्य होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. कारण मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांच्या टीमला कोणतंही वाहन उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. तसंच त्यांच्या सुरक्षेसाठीही काही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
अंकिताची चौकशी संपवून बिहार पोलिसांची टीम अंकिताच्याच जॅग्वार गाडीतून पुढच्या तपासासाठी निघून गेले.