मुंबई, 2 सप्टेंबर- कॉमेडियन,होस्ट, अभिनेता कपिल शर्मा त्याच्या सुपरहिट कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’सोबत छोट्या पडद्यावर परतला आहे. या शोमुळे तो प्रचंड चर्चेत आहे. यंदा काही नव्या कलाकारांचीसुद्धा शोमध्ये एन्ट्री झाली आहे. दरम्यान आता कपिल शर्माने आपल्या आगामी चित्रपटाचं पोस्टर रिलीज करून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. कॉमेडी किंग लवकरच ‘मेगा ब्लॉकबस्टर’ या चित्रपटात दिसणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर रिलीज करत कपिल शर्माने चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. ‘मेगा ब्लॉकबस्टर’चा ट्रेलर 4 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या गुड न्यूजमुळे कपिल शर्माचे चाहते खूप खूश आहेत. कपिल बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात कपिल शर्मासोबत रश्मिका मंदाना, तृष्णा कृष्णन आणि कार्ती या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीही झळकणार आहेत.या अभिनेत्रीनींही आपल्या मीडियावर पोस्टर शेअर करत चित्रपटाची माहिती दिली आहे.
या आगामी चित्रपटातील सर्व कलाकारांनी आपापल्या लुकचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. कपिल शर्माने रिलीज केलेल्या पोस्टरमध्ये तो ऑरेंज कलरच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे. पोस्टर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहलंय- ‘हे माझ्या चाहत्यांसाठी. आशा आहे की तुम्हाला ते आवडेल.’’ त्याने पुढे सांगितलं की, ट्रेलर 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.कपिलला या नव्या अंदाजात पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
**(हे वाचा:** कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेकमध्ये झाला होता वाद? कॉमेडीयनने स्वतः केला खुलासा ) तर दुसरीकडे साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानानेदेखील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटातील आपला लुक शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री अगदी ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसून येत आहे. तिच्याही चेहऱ्यावर कपिल सारखंच हसू दिसून येत आहे. अभिनेत्रीने फर्स्ट लुक शेअर करत ‘फन स्टफ’ असं म्हटलं आहे. अर्थातच हा चित्रपट एक कॉमेडीपट असणार आहे.