JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रणवीर सिंह असा झाला होता 'मुराद', पाहा 'गली बॉय'चे UNSEEN PHOTOS

रणवीर सिंह असा झाला होता 'मुराद', पाहा 'गली बॉय'चे UNSEEN PHOTOS

रणवीर सिंहनं 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘गली बॉय’ सिनेमात मुराद या गरीब घरातील महत्त्वाकांक्षी मुलाची भूमिका साकारली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 मे : रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट (Alia Bhatt) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या गली बॉय (Gully Boy)या सिनेमानं प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. खास करुन या सिनेमात रणवीर सिंहनं साकारलेली मुरादची भूमिका प्रत्येकाच्या मनाला भावली. मुराद हा एक गरीब घरातला मुलगा ज्याला रॅपर बनायचं असतं. रणवीरच्या या भूमिकेचं खूप कौतुकही झालं होतं. लोकांना फक्त गली बॉय हा सिनेमाच आवडला नाही तर त्या सिनेमातील रणवीरचा अभिनय आणि त्याचा लुक या दोन्ही गोष्टींची खूप चर्चा झाली. रणवीरची खासियत आहे की तो जी भूमिका साकारतो त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतो. अशात आता रणवीर सिंहचे मुरादच्या भूमिकेसाठी घेण्यात आलेल्या लुक टेस्टिंगचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात तो मुरादच्या कॉस्ट्यूममध्ये दिसत आहे. Instagram च्या माध्यामातून महिन्याला लाखो रुपये कमावते ही मॉडेल!

रणवीर सिंहचे फोटो त्यांच्या एका इन्स्टाग्राम फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यात रणवीर मुरादच्या लुकमध्ये दिसत आहे. हे फोटो त्यावेळचे आहेत जेव्हा मुरादसाठी कॉस्ट्यूम ठरवले जात होते. आता रणवीरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे या सिनेमाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या असून रणवीर सिंहचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे. (संपादन- मेघा जेठे.) इरफानच्या कबरीवर कुटुंबीय लावणार ‘रातरानी’चं झाडं, हे आहे खास कारण! स्वप्नील जोशीची रामानंद सागर यांच्याशी अशी झाली होती पहिली भेट!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या