मुंबई, 10 जानेवारी- दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ (siddharth) नेहमी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. यावेळी त्याने आपल्या खेळातून देशाची मान उंचावणारी बॅडमिंटनपटू सायना नेहवालबद्दल (Saina Nehwal) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सिद्धार्थने त्याच्या अधिकृत ट्विटरवर सायनाबद्दल असं काही लिहलं आहे ज्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता त्याच्या विरोधात राष्ट्रीय आयोगही कारावाई करण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय आयोगाने सिद्धार्थच्या विरोधात एफआयआर नोंदवून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता सिद्धार्थच्या या ट्विटवर सायना नेहवालची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सिद्धार्थच्या ट्वीटवर आता सायना नेहावलची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. News18.com शी बोलताना सायना नेहवाल म्हणाली की, मला समजले नाही त्याला नेमके काय म्हणायचे आहे. मला तो एक अभिनेता म्हणून नेहमी चांगला वाटत होता. मात्र त्यानं जे केले आहे ते योग्य नव्हते. तो चांगल्या पद्धतीने देखील व्यक्त होऊ शकत होता. पण कदाचित ट्विटरव अशा शब्द वापरल्यानंतर आपण लोकांच्या लगेच नजरेत व चर्चेत येतो..त्यामुळे त्यानं कदाचित असं केलं असावं असं तिनं यावेळी सांगितलं. शिवाय ती एवढ्यावर थांबली नाही. ती म्हणाली की, जर देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची अशी अवस्था असेल तर मला देशाच्या सुरेक्षबद्दल खात्री वाटत नाही. सिद्धार्थने सायना नेहवालच्या एका पोस्टवर कमेंट केली आहे ज्यामुळे तो अडचणीत आला आहे. सायना नेहवालने पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत एक पोस्ट लिहिली होती. सायनाने लिहिले होते की, ‘कोणतेही राष्ट्र स्वत:च्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड करत असेल तर ते स्वत:ला सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाहीत. पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करते. #BharatStandsWithModi #PMModi.. अशी पोस्ट तिनं केली आहे. यानंतर रंग दे बसंती फेम अभिनेता सिद्धार्थने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सायनाबद्दल काही अपशब्द वापरण्यात आले आहेत. ज्यामुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.
सिद्धार्थच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे की, ज्या व्यक्तीने देशाला सन्मान मिळवणून दिला आहे त्याच्यासाठी अशी भाषा वापरणे योग्य आहे का..असा सवालच केला आहे. शिवाय तू हे सगळे पैसे कमवण्यासाठी करत आहे का..असा देखील त्याला प्रश्न विचारला आहे. अभिनेता म्हणून तू आधीच तुझी पातळी सोडली आहेस, आता माणुसकीही हरवली आहेस का?, तर दुसर्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, एका महिलेचा सन्मान दुखावल्याबद्दल याला अटक झाली पाहिजे. अनेक लोक सिद्धार्थला लूजर म्हणत आहेत व त्याचे सोशल अकाउंट सस्पेंड करण्याची मागणी करत आहेत.
एका यूजरने लिहिले आहे की, ‘हा नीच कोण आहे? हा बहुतेक पॉर्न फिल्मचा अभिनेता असावा? ट्विटर सुद्धा गाढवांना ब्ल्यू टिक्स कसे देते!… ‘त्याचे हे ट्विट वाचून लोक त्याला सायको म्हणत आहेत आणि मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घेण्यास सांगत आहेत. नेटकरी म्हणत आहेत की, बहुतेक त्याच्या मेंदूने काम करणे बंद केले आहे. करिअरमध्ये फ्लॉप चित्रपट देणारा हा आता सायनाला शिकवायला आला आहे.