बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांना प्रचंड टॅलेंट असूनही हवी तशी संधी मिळत नाही. त्यांना कायम योग्य संधीची वाट पाहावी लागते. सध्याच्या काळात अशाच अभिनेत्यांना अभिनयाच्या जीवावर हळूहळू ओळख मिळायला सुरवात झाली आहे. रणदीप हुडा याचं ताज उदाहरण आहे. असे अजून बॉलिवूडमधील कोण underrated 11 अभिनेते आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहे.
रणदीप हूडाचं (Randeep Hooda) नाव सध्या सावरकरांच्या भूमिकेमुळे चर्चेत आलं आहे. रणदीप चांगला अभिनेता असयमही त्याला ही भूमिका मिळाला अनेक वर्ष लागली. रणदीपसारखे असे अजून 11 underrated कलाकार माहित आहेत का?
1. संजय मिश्रा ऑफिस ऑफिस या मालिकेतील शुक्ला या पात्रामुळे ओळख मिळालेले अभिनेते संजय मिश्रा यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळवायला बरीच वाट पाहावी लागली. कॉमेडी भूमिकांसह सिरीयस भूमिकाही ते लीलया पेलू शकतात हे त्यांनी कायम दाखवून दिलं आहे.
2. मनोज बाजपेयी मनोज बाजपेयी नावाचा अत्यंत हुशार आणि अप्रतिम अभिनयकौशल्य असणाऱ्या अभिनेत्याला आत्ता कुठे 'फॅमिली मॅन'सारख्या सिरीजमुळे नाव मिळतं आहे. मनोज बाजपेयीला राम गोपाल वर्मांच्या 'सत्या' मधून मोठा ब्रेक मिळाला. समीक्षकांच्या पसंतीस पडलेल्या गँग्स ऑफ वासेपूरमध्ये मनोज बाजपेयीला सरदार खान साकारायला मिळाला.
3. जयदीप अहलावत- 'पाताल लोक' या वेबसिरीजमधून पुन्हा उभारी घेणारा अभिनेता जयदीप अहलावतने या आधी अनेक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाचं उत्तम ज्ञान आणि ते वापरण्याची त्याहूनही सर्वोत्तम शैली माहित असणाऱ्या या अभिनेत्याने आणखी बऱ्याच प्रोजेक्ट्समधून सारखं सारखं प्रेक्षकांना भेटायला यावं अशी इच्छा आहे.
4. के के मेनन ब्लॅक फ्रायडे, गुलाल, बेबी आणि आत्ता आलेल्या स्पेशल ऑप्स अश्या अप्रतिम कलाकृतीतून दिसलेला गुणी अभिनेता के के मेनन मागच्या काही काळापासून पुन्हा एकदा नावारूपाला येऊ लागला आहे. त्याला बॉलिवूडमध्ये आणखी जास्त काम मिळावं आणि अजून विविधांगी भूमिकांमधून त्याने भेटीला यावं अशी त्याच्या फॅन्सची इच्छा आहे.
5. अभिषेक बच्चन शहनशाह अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेकच्या अंगात उत्तम अभिनय अंग असूनही त्याला म्हणाव्या तश्या फिल्म्स मिळाल्या नाहीत. त्याच्या अभिनयाला न्याय देणाऱ्या आणखीन जास्त कलाकृती त्याला मिळाव्या आणि एकेकाळी ब्लफमास्टर, गुरु, बंटी बबली चित्रपटांसारखा हिट काळ पुन्हा त्याला बघता यावा अशी चाहत्यांची इच्छा आहे.
6. विवेक ओबेरॉय विवेकने त्याच्या उमेदीच्या काळात साथिया, रक्तचरित्र अश्या चांगल्या फिल्म्स केल्या आहेत. विवेकला पुन्हा चांगलं काम मिळावं असं फॅन्सना वाटतं.
7. सैफ अली खान बेबोचा नवरा सैफ मधल्या काळात कोणत्याच मोठ्या फिल्ममधून लीड भूमिकेत दिसला नाही. त्याच्या काळात त्याने बऱ्याच हिट फिल्म दिल्या असल्या तरी त्याच्या टॅलेंटला चांगला न्याय मिळावा असं अजूनही वाटत राहतं.
8. आर माधवन साऊथमध्ये चांगलं नाव असलेला आर माधवन बॉलिवूडमध्ये मोजक्याच पण उत्तम भूमिकांमध्ये दिसला. त्याच्या फरहान कुरेशी भूमिकेची चर्चा अजूनही आहे. माधवन नेटफ्लिक्सच्या डीकपल्ड सिरीजमध्ये सुद्धा होता. त्याला नव्या आणि वेगळ्या रोल्समध्ये बघायची सगळ्यांची इच्छा आहे.
9. अभय देओल ओय लकी लकी ओय, देव- डी चित्रपटातून समोर आलेला हॅण्डसम हंक अभय देओल कायम दर्जेदार भूमिकांमध्ये दिसून येतो. त्याच्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाची प्रेक्षक वाट बघत आहेत.
10. नीरज काबी एक अत्यंत टॅलेंटेड अभिनेता असलेला नीरज काबी आत्ता आत्ता लोकप्रिय होऊ लागला आहे. त्याने अजून चांगलं काम करावं आणि असंच नाव टिकवून ठेवावं अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.
11. अर्शद वारसी मुन्नाभाईचा सर्किट अर्थात अर्शद वारसीला त्याच टॅलेन्ट दाखवता येतील असे रोल कमीच मिळाले. धमाल, मुन्नाभाई अश्या चित्रपटांपेक्षा एखाद्या सिरीयस भूमिकेची ऑर त्याला मिळवी अशी इच्छा आहे.