एखाद्या भूमिकासाठी जीव ओतून मेहनत घेणारा अभिनेता रणदीप हुडाने आज वर्सोवा बीच साफ करण्यासाठी मेहनत घेतली. किनाऱ्यावर पावसामुळे आलेले प्लॅस्टिक उचलण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना त्याने मदत केली.
कोरोना व्हायरसच्या संकटकाळात अभिनेता रणदीप हुडा वर्सोवा याठिकाणचा समुद्र स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सहभागी झाला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @@randeephooda)
सोशल मीडियावर त्याने त्याचा मित्र अफरोझ शाह बरोबर या मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यांनी मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना समुद्र किनाऱ्यावरील सफाईसाठी मदत केली (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @@randeephooda)
मान्सून सुरू झाल्यानंतर समुद्रातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाहेर फेकले जाते. ते उचलताना सफाई कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येतात. अशावेळी असे मदतीचे हात नक्कीच उपयोगी ठरतात. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @@randeephooda)
निसर्गाचा आदर करण्यास आपण सुरूवात केली पाहिजे अशा आशयाचे कॅप्शन देत रणदीपने हे फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @@randeephooda)
दरम्यान साफसफाई करताना रणदीपने कोरोनामुळे विशेष काळजी देखील घेतली होती. मास्क आणि ग्लोव्ह्ज परिधान करून त्याने बाहेर पाऊल टाकले होते (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
'घराजवळ असणारा समुद्र मी स्वच्छ करत आहे. आपण जे काही थोडेफार करू शकतो ते करू या', असं आवाहन यावेळी त्याने केलंय (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @randeephooda)
रणदीप आणि अफरोझ सफाई कर्मचाऱ्यांमध्ये मिळून मिसळून काम करताना दिसून आले (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @randeephooda)
एखाद्या भूमिकासाठी जीव ओतून मेहनत घेणारा अभिनेता रणदीप हुडाने आज वर्सोवा बीच साफ करण्यासाठी मेहनत घेतली. किनाऱ्यावर पावसामुळे आलेले प्लॅस्टिक उचलण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना त्याने मदत केली. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @randeephooda)
मुंबईत पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरूवात केली आहे. त्यानंतर समुद्रातील कचरा मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर आला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @randeephooda)
अशावेळी रणदीप हुडाने हे पाऊल उचलल्यानंतर त्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @randeephooda)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी रणदीपला 'खरा हिरो' संबोधले आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @randeephooda)