भल्लालदेव म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा राणा दग्गूबाती आज बोहल्यावर चढणार आहे. मिहिका बजाजबरोबर तो लग्नबेडीत अडकणार आहे. दरम्यान या दोघाच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राणा दग्गूबाती (Rana Daggubati) आणि मिहिका बजाज आज बोहल्यावर चढणार आहेत. या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @reelsandframes)
यामध्ये लग्नविधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राणा आणि मिहिकाची मेंहेंदी आणि हळदीचे हे फोटो आहेत (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम @ranadaggubati)
राणा अर्थात प्रेक्षकांचा लाडका बाहुबलीमधील भल्लालदेव आज 08 ऑगस्ट पोजी बोहल्यावर चढणार आहे. त्याने आज एक फोटो देखील शेअर केला आहे. त्याने वडील आणि काकांबरोबर पोज देत हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने 'रेडी' असे कॅप्शन दिले आहे (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम @ranadaggubati)
या लग्नविधींदरम्यान मिहिकाने परिधान केलेला हा गुलाबी रंगाचा गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचे खूप फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @reelsandframes)
या व्हायरल फोटोंमध्ये नटली-सजलेली मिहिका खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @_addzee_)
मिहिकाने तिच्या आउटफिटला साजेशी असे दागिने यावर घातले आहेत. ज्यामुळे तीचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @_addzee_)
राणा दग्गुबातीच्या कुटुंबीयांपैकी एक अभिनेत्री समंथा देखील आहे. लग्नातील त्या दोघांचा हा कँडिट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @_addzee_)