JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'माझी फिगर पाहा,' आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याने भाजपच्या महिला नेत्या भडकल्या

'माझी फिगर पाहा,' आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याने भाजपच्या महिला नेत्या भडकल्या

वयाच्या ५७ व्या वर्षीही माझी फिगर पाहा असं कॅप्शन या फोटोवर लिहिलं गेलं आहे.

जाहिरात

जया प्रदा या पहिल्यांदा समाजवादी पक्षात होत्या. मात्र आता त्यांनी भाजपमध्ये समावेश केला. रामपुर येथून त्या निवडणूक लढवणार आहेत. सपामध्ये असताना जया यांनी उथूनच निवडणूक जिंकली होती. २००४ ते २००९ मध्ये त्या खासदारही होत्या. मात्र २०१४ मध्ये त्यांनी आरएलडीच्या तिकीटावर बिजनौरकडून निवडणूक लढवली होती. यात त्यांचा दारुण पराभव झाला.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जून- बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप नेत्या जयाप्रदा या सायबर क्राइमच्या शिकार झाल्या आहेत. सोशल मीडियावर जया प्रदा यांचं खोटं अकाउंट बनवून त्यांचा एक फोटो शेअर केला. एवढंच नाही तर त्या फोटवर आक्षेपार्ह कॅप्शनही लिहिलं. मंगळवारी जया प्रदा यांनी स्वतः त्या पोस्टचा फोटो शेअर करत समर्थकांना अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा दिला. जया प्रदा यांनी भाजप पक्षाकडून उत्तर प्रदेश येथील रामपुर लोकसभा सीटवर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांनी त्यांचा १ लाख ९ हजार ९९७ मतांनी पराभव केला. लग्नाआधी गरोदर राहिली अभिनेत्री, रस्त्यावरच केलं असं काही की लोक झाले हैराण भाजप नेत्या आणि माजी खासदार जया प्रदा यांनी सोशल मीडियावर तो आक्षेपार्ह फोटो शेअर करत म्हटलं की, ‘हा फोटो माझ्या एका हितचिंतकाने पाठवला. काही लोक माझ्या नावाचा वापर करून खोटं अकाउंट तयार करत आहेत. एवढंच नाही तर त्यात अभद्र भाषेचा वापर करून भोळ्या भाबड्या लोकांना फसवत आहेत. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की अशा पोस्ट दिसल्यास तातडीने रिपोर्ट करा. हे प्रकरण आता माझे वकील पाहत असून अशा असामाजिक गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. कारण ही गोष्ट फक्त माझी नसून महिलांच्या सन्मानाची आहे.’

हृतिकची बहीण सुनैना रोशन म्हणाली, माझं समर्थन कंगनाला! याआधी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या जया प्रदा यांनी राज्य निर्वाचन आयुक्त, राज्य निर्वाचन आयोग आणि मुख्य निर्वाचन आयुक्तांना पत्र लिहित, समाजवादी पार्टीचे नवनिर्वाचित खासदार आजम खान यांची निवड अवैध्य असल्याचं म्हटलं. याशिवाय त्यांनी निवडणूक रद्द करण्याचीही मागणी केली होती. VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या