JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Rakhi Sawant: मोठी बातमी! राखी सावंतला अटक; अभिनेत्रीवर गंभीर आरोप

Rakhi Sawant: मोठी बातमी! राखी सावंतला अटक; अभिनेत्रीवर गंभीर आरोप

बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर राखी सावंतबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे.

जाहिरात

राखी सावंत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जानेवारी- बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर राखी सावंत बाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. राखी सावंतला पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त आहे. मुंबईतील अंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे. शर्लिन चोप्राबाबत आपत्तीजनक वक्तव्ये  केल्याचा राखीवर आरोप आहे. काही वेळेत अभिनेत्रीला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने राखी विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता राखीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शर्लिन चोप्राने स्वतः आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. शर्लिन चोप्राने ट्विट करत अंबोली पोलिसांनी राखीला अटक केल्याचं सांगितलं आहे. सोबतच शर्लिन चोप्राने आपल्या एफआरआयबाबत अतिरिक्त माहितीसुद्धा नमूद केली आहे. नुकतंच समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, राखी सावंतने शर्लिन चोप्राबाबत आपत्तीजनक वक्तव्ये केल्याने शर्लिन चोप्राने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ज्यासाठी तिला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या

काय आहे नेमकं प्रकरण? ‘बिग बॉस 16’ च्या सुरुवातीला अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्राने दिग्दर्शक साजिद खानला शोमध्ये सहभागी केल्याने नाराजी व्यक्त केली होती. साजिद खानने आपल्याला अश्लील प्रकारे वागणूक दिल्याचा गंभीर आरोप अभिनेत्रीने केला होता. तसेच साजिद खानने अनेक मुलींचं लैंगिक शोषण केल्याचासुद्धा आरोप शर्लिनने केला होता. त्यानुसार अशा व्यक्तीला बिग बॉससारख्या शोमध्ये राहण्याचा हक्क नसल्याचं तिचं म्हणणं होतं.

दरम्यान राखी सावंतने या प्रकरणात उडी घेत काही वक्तव्ये केली होती. राखी सावंत साजिद खानला भाऊ मानत असल्याने तिने शर्लिन चोप्राच्या या सर्व आरोपांना फेटाळून लावत हे सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. तसेच शर्लिनबाबत काही वक्तव्ये केली होती. हा सर्व प्रकार पाहून शर्लिन चोप्रा राखीवर भडकली होती. तसेच तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. राखी सावंतचा अटकपूर्व जामीन काल मुंबई सेशन कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानुसार अंबोली पोलिसांनी आज राखी सावंतला अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या