राखी सावंत
मुंबई, 15 जानेवारी- बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सध्या आपल्याखाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या लग्नाच्या खुलाश्यानंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ माजला आहे. एकीकडे राखी सावंतने फोटो शेअर करत आपल्या लग्नाची कबुली दिली आहे. तर दुसरीकडे राखी आपला नवरा म्हणत असलेला आदिल दुर्रानी मात्र या विषयावर मौन बाळगून आहे. तो आपल्या लग्नाबाबत काहीही बोलायला तयार नाहीय. दरम्यान राखी आदिल आपल्या फसवत असल्याची आणि आपलं लग्न होऊन त्या गोष्टीतला नाकारत असल्याचे आरोप करत आहे. अशातच आता राखी सावंतचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री मुंबईच्या भर रस्त्यात ढसाढसा रडताना दिसून येत आहे. प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राखी पापाराझींसोबत बोलतांना आणि भररस्त्यात रडतांना दिसून येत आहे. अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर आपलं दुःख व्यक्त करत आहे. राखी म्हणत आहे,’ माझं लग्न तर झालं आहे, मात्र आदिल या गोष्टीला नकार देत आहे. आता मी काय करु कुठे जाऊ. ना मला झोप येते ना मला जेवण जातं. सगळं दुःख माझ्याच नशिबात का? अभिनेत्री पुढे म्हणते माझ्या मामा, मावशी सर्व कुटुंबातील लोकांना आता ही गोष्ट कळाली आहे. **(हे वाचा:** Rakhi Sawant: लग्नानंतर राखी सावंतने बदललं आपलं नाव; समोर आलं अभिनेत्रीचं नवं नाव ) ‘परंतु त्यांनी मला सांगितलंय माझ्या आई पर्यंत ही गोष्ट अजिबात पोहोचायला नको. सध्या त्या बेशुद्ध आहेत. परंतु त्यांना शुद्ध आल्यांनतर जर ही गोष्ट समजली, तर काय होईल. याच गोष्टीची भीती आहे. राखी सावंतची आई सध्या रुग्णालयात आहे. त्या ब्रेन ट्युमर-कॅन्सरसोबत झुंज देत आहेत. त्याचाय्वर सध्या उपचार सुरु आहेत. याआधीसुद्धा राखीच्या आईनीं कॅन्सरचा लढा दिला आहे. त्यांना आता पुन्हा एकदा हा आजार उदभवला आहे.
चार-पाच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर राखी सावंत आणि आदिल दुर्रानीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये या दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याचं दिसून येत होतं. या फोटोनंतर राखी सावंतने स्वतः पोस्ट शेअर करत आपलं लग्न झाल्याची कबुली दिली होती. परंतु लगेचच नंतर आदिल आपल्याला फसवत असल्याचा आणि आपलं लग्न मान्य करत नसल्याने आपल्याला हा खुलासा करावा लागल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर एक खळबळ माजली आहे.
तर दुसरीकडे आदिल दुर्रानीने एका वेबसाईटला मुलाखत देत, आपल्यला दहा-बारा दिवसांचा वेळ हवा असल्याचं म्हटलं आहे. या दहा दिवसानंतर आप स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्या फोटोंचा आणि या सर्व गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु आता मी या गोष्टीवर काहीही बोलणार नाहीय.