JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नानंतर पहिल्यांदाच Rajkumar Rao पत्नी Patralekhaa सोबत झाला स्पॉट; नवं दाम्पत्याचा VIDEO होतोय VIRAL

लग्नानंतर पहिल्यांदाच Rajkumar Rao पत्नी Patralekhaa सोबत झाला स्पॉट; नवं दाम्पत्याचा VIDEO होतोय VIRAL

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार रावने (Rajkumar Rao) 15 नोव्हेंबरला त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री पत्रलेखासोबत (Patralekhaa) लग्न (Wedding) केले आहे. राजकुमार आणि पत्रलेखा लग्नानंतर पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर एकत्र स्पॉट झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 नोव्हेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता राजकुमार रावने   (Rajkumar Rao)  15 नोव्हेंबरला त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री पत्रलेखासोबत  (Patralekhaa) लग्न  (Wedding)  केले आहे. राजकुमार आणि पत्रलेखा लग्नानंतर पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर एकत्र स्पॉट झाले आहेत. यादरम्यान, दोघेही स्वत: खूप आनंदी दिसत होते. आणि दोघांनीही आनंदाने पापाराझींसाठी पोज दिल्या. पत्रलेखा लाल साडीत अतिशय सुंदर दिसत होती. तर राजकुमार राव संपूर्ण पांढऱ्या ड्रेसमध्ये खूपच हँडसम दिसत होता.

सध्या राजकुमार आणि पत्रलेखाचा हा व्हिडिओ  (Viral Video)  सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. तासाभरापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ 16 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. लग्नानंतर लगेचच, राजकुमारने त्याच्या लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं होतं, ‘अखेर 11 वर्षांच्या प्रेम, रोमान्स, मैत्री आणि मजा केल्यानंतर, आज मी माझ्याजवळ असलेल्या सर्व गोष्टींशी लग्न केले… माझी आत्मा, माझी सर्वात चांगली मैत्रीण,माझं कुटुंब. आज तु मला पती म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी दुसरा आनंद नाही’.

तर दुसरीकडे पत्रलेखाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी आज माझ्या मालकीच्या सर्व गोष्टींशी लग्न केले आहे; माझा प्रियकर, माझे कुटुंब, माझा सोबती… गेल्या 11 वर्षांपासून माझा सर्वात चांगला मित्र! तुमची पत्नी होण्यापेक्षा मोठी भावना नाही!’’ मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमार आणि पत्रलेखा यांनी चंदीगडमधील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये लग्न केले आहे. हा रिसॉर्ट चंदीगडचा सर्वात आलिशान रिसॉर्ट आहे. ज्याचे नाव ओबेरॉय सुखविलास स्पा रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट एका जंगलात 800 एकर परिसरात पसरले आहे.राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्सनीही हजेरी लावली होती. राजकुमार राव आणि पत्रलेखा पॉल दोघेही गेल्या 11 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी ‘सिटीलाइट्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. राजकुमार राव याआधी चित्रपटात दिसला असला तरी ‘सिटीलाइट्स’ने दोघांनाही ओळख दिली. चित्रपटातील पत्रलेखा आणि राजकुमार या दोघांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटासाठी पत्रलेखाला ‘बेस्ट फिमेल डेब्यू’ पुरस्कारही मिळाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या