Christmas Celebration : 25 डिसेंबर रोजी देशभरात ख्रिसमसचा सण साजरा करण्यात आला. यावेळी अभिनेत्री कीर्ती सुरेशनेही सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रजनीकांत यांच्या 'अन्नाथे' या चित्रपटात त्यांच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कीर्ती सुरेशने मागच्या काळात फार चर्चा झाली होती. परंतु आता 25 डिसेंबरला देशभरात ख्रिसमसचे सेलिब्रेशन करण्यात आले आणि त्यानिमित्ताने कीर्ती सुरेशनं काही फोटोही शेअर केले आहेत. त्यात ती रजनीकांत यांच्यासोबत ख्रिसमस सेलिब्रेट करत आहे.
अभिनेत्री कीर्ती सुरेशने आपल्या मित्रांसोबत ख्रिसमस साजरा केला आहे. फोटो शेअर करताना तिनं लिहिलंय की, 'तुम्हाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशा करतो की तो तुमचं आयुष्य सकारात्मकता आणि प्रेमानं परिपूर्ण असेल.'
तिनं शेयर केलेल्या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाचा पायजामा आणि लाल टी-शर्टमध्ये दिसत आहे. मोकळ्या केसांमध्ये लाल हेअरबँड घालून एक सुंदर स्माईल देत आहे.
किर्तीनं फोटो शेयर केल्यानंतर काही तासांतच फोटोंना साडेआठ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून चाहते तिच्या लूकचे कौतुक करत आहेत.
कीर्ती सुरेशने 'सरकारु वारी पाटा', 'आचार्य' आणि 'मैदान' या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.
अभिनेत्री कीर्ती सुरेशचं वय केवळ 29 असून या वयात तिनं भरपूर ओळख मिळवलेली आहे. तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळालेला आहे.