JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'राजा राणीची गं जोडी' मालिकेतील अभिनेता चढला बोहल्यावर, या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ

'राजा राणीची गं जोडी' मालिकेतील अभिनेता चढला बोहल्यावर, या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ

छोट्या पडद्यावरील राजा राणीची गं जोडी लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील अभिनेता नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 डिसेंबर - छोट्या पडद्यावरील राजा राणीची गं जोडी लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील अभिनेता नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारे दादासाहेब ढाणे पाटील म्हणजे अभिनेता शैलेश कोरडे **( shailesh korde )**यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शैलेश कोरडे यांनी लग्नाचे फोटो शेअर करत म्हटले आहे की, अचानक निर्णय झाल्यामुळे आणि कोविडच्या निर्बंधांमुळे कमी मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. तरी आपणा सर्वांचे आशिर्वाद आमच्या सदैव पाठीशी आहेत अशी अपेक्षा करतो.धन्यवाद..यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा- Nora Fatehi ला हवाय असा Life partner; पाहा तुमच्यात ते गुण आहेत का? शैलेश कोरडे यांनी दोन दिवसांपूर्वी अगदी सध्या पद्धतीने अभिनेत्री श्रुती कुलकर्णी हिच्यासोबत लग्न गाठ बांधली आहे. स्पेशल पोलीस फोर्स या मालिकेतून श्रुती कुलकर्णीने अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनया सोबतच श्रुती कुलकर्णीला नृत्य आणि गायनाची आवड आहे.

संबंधित बातम्या

संजीवनी आणि रणजित यांच्या आयुष्यात अनेक संकट येण्याचे कारण दादासाहेब ढाणे पाटील हेच होते. त्यांच्या कटकरस्थानाचा काही दिवसांपूर्विच उलगडा झाला होता. याच भूमिकेमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. दादासाहेब हे विरोधी पात्र असल्याने प्रेक्षकांनी नेहमी त्यांचा तिरस्कार केला मात्र खऱ्या अर्थाने त्यांच्या अभिनयाची हीच पोहचपावती आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या