राज ठाकरे -शर्मिला यांच्यातील प्रेमाचा दुवा होती 'ही' मराठी अभिनेत्री
मुंबई, 21 जून : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकारणातील आयुष्या विषयी तर सगळ्यांना माहित आहे.पण खूप कमी लोकांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल माहित आहे. त्यात त्यांची लव्ह स्टोरी ही त्यांच्यासारखीच हटके आहे. राज ठाकरे यांची बहीण आणि शर्मिला ठाकरे या एकमेकींच्या खास मैत्रिणी होत्या. त्यामुळे शर्मिला ठाकरे यांचं राज ठाकरेंच्या घरी येणं जाणं होतंच. तेव्हाच दोघांमध्ये प्रेमाचं नातं फुलू लागलं होतं. त्यावेळी एकमेकांना सहसा प्रेमपत्र पाठवले जायचे. तर राज ठाकरे आणि शर्मिला हे एकमेकांना प्रेमपत्र पाठवण्यासाठी चक्क एका मराठी अभिनेत्रीची मदत घ्यायचे. स्वत: त्या अभिनेत्रीने याचा खुलासा केला आहे. सध्या या अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. शर्मिला ठाकरे या नाट्यकलावंत मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरे यांना आधीपासूनच कलेची आवड होती. राज ठाकरे आणि शर्मिला यांची घरं दादरमध्येच. तसंच मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांचं घरही दादरमध्येच होतं. वंदना गुप्ते आणि शर्मिला ठाकरे दोघीही एकमेकींच्या मैत्रिणी. मोहन वाघ यांच्या कित्येक नाटकात वंदना गुप्ते यांनी काम केलंय. अमिताभ यांची नात नव्या नंदाचा नवा व्हिडिओ व्हायरल, शुद्ध हिंदीनं जिंकलं मन राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत वंदना गुप्ते म्हणाल्या की, ‘मी त्यांची लव्हलेटर पोहोचवायचे. दादरच्या मकरंद सोसायटीसमोर जो रस्ता आहे तिथून मी येत होते. तेव्हा समोरुन शर्मिला आली आणि मला म्हणाली वंदूताई मी तुझ्यासोबत होते हं. मला काही कळलं नाही. नंतर मी पाहिलं तर तिच्या घराच्या गेटवर तिचे वडील म्हणजे मोहन वाघ वाट पाहत उभे होते. तेव्हा मला समजलं की हिचं काहीतरी सुरु आहे.‘नंतर दोघंही एकमेकांना चिठ्ठ्या पाठवायचे. ते पोहोचवायचं काम माझ्याकडे असायचं. आजही आम्ही शेजारी आहोत आणि आमचं घरी येणं जाणं आहे.
सध्या वंदना गुप्ते त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमात रोहिणी हट्टंगडी, दीपा परब, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर यांची मुख्य भूमिका असणार आहे.त्या या सिनेमाच्या प्रमोशनात व्यस्त आहेत. यानिमित्तच त्यांनी राज ठाकरे यांच्या लव्हस्टोरीचा खुलासा केला.
शिरीष पारकरने राज ठाकरे आणि शर्मिला यांची ओळख करुन दिली होती. शिरीष हे राज आणि शर्मिला यांचे कॉमन फ्रेण्ड होते. “तेव्हापासून राज माझ्या मागे होता,” असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या. या दोघांची लव्हस्टोरी खरचं खूप रंजक आहे.