बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा इंडस्ट्रीचं सगळ्यात प्रसिद्ध आणि चर्चेत असणारं जोडपं आहे. दोघांनीही जवळपास 2 वर्षं डेटिंग केल्यावर एकमेकांना लाइफ पार्टनर बनवण्याचा निर्णय घेतला होता.
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची प्रेम कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. त्यांच्या आयुष्यातले चढ-उतार बॉलिवूडच्या स्क्रिप्टसारखेच आहेत. त्यांना दोन मुलं देखील आहेत विवान आणि शमीषा अशी या दोघांची नावं आहेत.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा लंडनमध्ये एका कॉमन मित्रामुळे भेटले. 2007 मध्ये शिल्पाने 'बिग ब्रदर' हा इंटरनॅशनल शो जिंकला आणि जगभरात तिची ओळख निर्माण झाली. शिल्पाने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की राजच्या स्माईलने तिला त्यांच्या पहिल्याच भेटीत वेड लावलं होतं.
राज कुंद्राने शिल्पाला पॅरिसमध्ये प्रपोज केलं होतं. राजने जेव्हा शिल्पाला प्रपोज केलं तेव्हा तिला धक्काच बसला. त्याने संपूर्ण बँक्वेट हॉल यासाठी बुक केला होता. डिनर झाल्यावर जेव्हा डेझर्ट आलं तेव्हा त्यासोबत 5 कॅरेटची डायमंड रिंगही आली. या नंतर राजने गुडघ्यावर बसून शिल्पाला प्रपोज केलं.
Raj Kundra, राज कुंद्राची पहिली बायको कविताने शिल्पावर आरोप करत राजने तिला आणि तिच्या नवजात मुलीला शिल्पामुळे सोडल्याचा दावा केला होता. आम्हा दोघांची भेट होण्यापूर्वीच राज आणि कवितांचं लग्न मोडलं होतं, असं सांगत शिल्पाने आरोप फेटाळले होते.
यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 22 नोव्हेंबर 2009 रोजी शिल्पाने राज कुंद्राशी लग्न केले.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे दोघे एकमेकांचा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करतात. म्हणून त्यांचं लग्न अजूनही टिकून आहे.
शिल्पा शेट्टीने 12 मे 2012 रोजी खार येथील हिंदुजा हेल्थकेअर सर्जिकल हॉस्पिटलमध्ये तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला.
त्यानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा सरोगेसीच्या माध्यमातून एका मुलीचे पालक झाले. शमीषा शेट्टी कुंद्रा असं तिचं नाव आहे. शिल्पाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आरोग्याच्या काही समस्येमुळे तिने सरोगेसीचा निर्णय घेतला होता.