JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Lagnachi Bedi : अखेर राघव देणार सिंधूवरील प्रेमाची कबुली!; पण काकू स्वीकारणार का हे नातं? एपिसोड अपडेट आला समोर

Lagnachi Bedi : अखेर राघव देणार सिंधूवरील प्रेमाची कबुली!; पण काकू स्वीकारणार का हे नातं? एपिसोड अपडेट आला समोर

राघव सिंधूवरील आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे. पण त्यातही मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे.

जाहिरात

lagnachi bedi

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,12 सप्टेंबर : स्टार प्रवाह वरील मालिका ‘लग्नाची बेडी ’ चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील सिंधू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सिंधूमध्ये अल्लडपणा आहे पण सोबतच ती बिनधास्त आहे पण ती तितकीच जबाबदारीने वागते. प्रत्येक बाबतीतील तिचा खंबीरपणा, तिची कुठलीही परिस्थिती हाताळण्याची पद्धत प्रेक्षकांना भावते. मालिकेतील राघव आणि सिंधू यांचं लग्न अपघातानेच झालं होतं. पण आता त्यांच्यात हळूहळू मैत्री होत गेली आणि मैत्रीचं आता प्रेमामध्ये रूपांतर झालं आहे. बऱ्याच दिवसांपासून राघव सिंधूला आपल्या मनातील प्रेम सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण आता अखेर तो क्षण आला आहे. राघव सिंधूवरील आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे. पण त्यातही मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे. मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार काकू सिंधूला अडकवण्यासाठी नवीन खेळी खॆळतात, पण त्याचा परिणाम वेगळाच होतो. प्रोमोमध्ये काकू, राणी मिळून सिंधूला अडकवण्यासाठी ज्यूसमध्ये औषध घालून देतात. ज्यामुळे सिंधूचे स्वतःवर नियंत्रण राहणार नाही आणि ती काहीतरी वेगळं करून बसेल. पण औषध घातलेला ज्यूस चुकून राघव पितो. त्यानंतर सगळी मजा होते. राघव स्वतःवरचे नियंत्रण गमावून बसतो. त्याच नशेत तो सिंधूवरच्या प्रेमाची कबुली देतो.

संबंधित बातम्या

पण ते प्रेमाचे शब्द सिंधूपर्यंत पोचलेच नाहीत. त्यावेळी काकू आणि राणी तिथे येतात. त्या राघवचं  बोलणं ऐकतात. आता पुढे नेमकं काय घडणार. राघवच्या भावना सिंधूपर्यंत पोचणार का ते बघणं रंजक ठरणार आहे. हेही वाचा - Farmani naaz : हर हर शंभो गाण्यामुळे प्रसिद्धी मिळवलेल्या गायिकेने थेट गायलं ‘चढती जवानी’; व्हिडीओ तुफान व्हायरल काकू आणि सिंधू मधील छोटी मोठी भांडणं प्रेक्षकांना आवडतात. आता येणाऱ्या भागात मालिकेला वेगळं वळण येणार आहे. पण  या प्रसंगांमध्ये राघवसुद्धा तिची साथ देणार आहे.मालिकेतील रत्नपारखी कुटुंबातील मोठ्या काकू आणि सिंधू यांच्यात सतत वाद होत असतात. सिंधूला काकू सतत विरोध करत असतात. राघव दोन्ही बाजू सांभाळत घरातील वाद टाळण्याची कसरत करत असतो. आता रत्नपारखी कुटुंबात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘लग्नाची बेडी’ मालिकेत अनेक ट्विस्ट येत असतात. मालिकेतील राघव आणि सिंधू यांचं लग्न अपघातानेच झालं होतं. पण आता त्यांच्यात हळूहळू प्रेम झालं आहे. आता इथूनपुढे मालिका बघायला प्रेक्षकांना मजा येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या