रानबाजार वेबसिरीज (Raanbaazar webseries) आणि Y सारखा एक सुंदर चित्रपट केल्यानंतर प्राजक्ता (Prajakta Mali) आता महाराष्ट्राची हास्यजत्राच्या (Maharashtrachi Hasyajatra) शूटिंगकडे वळताना दिसत आहे. तिने तिच्या फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळी ही अभिनेत्री सध्या बरीच चर्चेत असते. रानबाजार आणि Y अशा दोन वेगळ्या धाटणीच्या प्रोजेक्टमध्ये ती एकदम वेगळ्या ढंगाच्या भूमिकांमध्ये लागोपाठ दिसून आली. त्यासाठी तिचं बरंच कौतुक सुद्धा झालं.
सध्या या अभिनेत्रीने काही नवे फोटो शेअर केले असून त्याचं कारण साधंसुधं नाहीये. महाराष्ट्राची हास्यजत्रा आता नव्या सिझनसह परत येत आहे आणि त्याच निमित्ताने तिचे कायम होणारे फोटोशूट परत आल्याने सध्या ती आनंदात आहे.
एका लुकमध्ये मध्ये ती गुलाबी रंगाच्या घागऱ्यात दिसत आहे तर दुसऱ्या लुकमध्ये तिने राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
तर दुसऱ्या आउटफिटसाठी तिने एक हिंदी शायरी लिहून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. यामध्ये ती असं लिहिते, तेरे फ़ैसले पे सवाल न उठाऊँ यही मेरा इश्क़ है । - ओशो ♥️ तुझ्या कोणत्याच निर्णयावर प्रश्नोत्तरं न करणं हे माझं प्रेम आहे असं ती लिहिते.