JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रियांकाच्या दीराने लास वेगासमध्ये केलं Game Of Throne च्या अभिनेत्रीशी लग्न

प्रियांकाच्या दीराने लास वेगासमध्ये केलं Game Of Throne च्या अभिनेत्रीशी लग्न

एका सरप्राइज वेडिंग सेरेमनीमध्ये दोघांनी लग्न केलं. डीजे डिप्लोने या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लास वेगास, 2 मे- प्रियांका चोप्राचा दीर आणि निक जोनसचा भाऊ जो जोनस आणि अभिनेत्री सोफी टर्नरने लास वेगासमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. सोफी आणि जो बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्ससाठी दोघं इथे पोहोचले होते. बुधवारी १ मे रोजी दोघंही इथेच होती. यानंतर एका सरप्राइज वेडिंग सेरेमनीमध्ये दोघांनी लग्न केलं. डीजे डिप्लोने या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला. यात सोफीने लग्नाचा पांढरा गाउन घातला आहे. तर जोनस ब्रदर्सने करड्या रंगाचा सूट घातला होता. Viral होतेय प्रियांका चोप्रा आणि निक जोनसची पब्लिक किस

जो आणि सोफी २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते. २०१७ मध्ये दोघांनी साखरपुडा केला. निक आणि प्रियांकाच्या लग्नातही हे दोघं होते. प्रियांका आणि निकनंतर आता हे दोघं कधी लग्न करणार असाच प्रश्न अनेकांना पडला होता. अखेच चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली. हे एक असं सरप्राइज होतं ज्याची कोणालाच कल्पना नव्हती. सोफी आणि प्रियांकामध्येही खूप चांगलं ब्रॉण्डिंग आहे. India’s Most Wanted Trailer- मलायकाच्या प्रेमात आकंठ बुडालेला अर्जुन कपूर जेव्हा देशासाठी जीवही द्यायला तयार होतो एकीकडे जो आणि सोफीच्या लग्नाच्याच चर्चा होत आहेत तर दुसरीकडे निक आणि प्रियांकाचा किसचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लॉस अँजेलिस येथील बिलबोर्ड म्युझिक अवॉर्डमधील हा व्हिडीओ आहे. या पुरस्कार सोहळ्यात निक आणि जोनस ब्रदर्स यांनी ‘केक बाय दी ओशन’ या गाण्यावर परफॉर्म केलं.

…और प्यार हो गया ! ‘या’ व्यक्तीमुळे सुरू झाली निक-प्रियांकाची लव्हस्टोरी जोनस ब्रदर्सच्या या गाण्याने पुरस्कार सोहळ्याला एक वेगळीच रंगत आणली होती. परफॉर्म करताना अचानक निक स्टेडवरून खाली आला आणि गिटार वाजवत प्रियांकाच्या दिशेने नाचत गेला. प्रियांकानेही त्याच्या गाण्यावर ताल धरला होता. तेव्हाच दोघांनी एकमेकांना किस केलं. दोघांचा हा क्यूट रोमान्स पाहून सुरुवातीला सर्वांना आश्चर्य वाटलं पण नंतर साऱ्यांनीच त्यांच्या या कृतीचं कौतुक केलं. टपरीवर पुरंदरची भेळ आणि उसाचा रस, आमिर-किरणचा VIDEO व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या