JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रियांका चोप्राचं 2014 मध्येच झालं होतं लग्न? काय आहे Viral Photoचं सत्य

प्रियांका चोप्राचं 2014 मध्येच झालं होतं लग्न? काय आहे Viral Photoचं सत्य

या तरुणानं प्रियांकाशी लग्न केल्याचा दावा करत एक फोटो सुद्धा शेअर केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 मे : बॉलिवूड स्टार्सच्या क्रेझी फॅन्सबद्दल रोज काही ना काही किस्से ऐकायला मिळतात. काही असे चाहते ज्यांची त्यांच्या आवडत्या सिनेस्टारसोबत काही ना काही क्रेझी स्टोरी असते. नुकताच ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राच्या बाबतीतही असाच एक किस्सा ऐकायला मिळत आहे. सोशल मीडियावर एक तरुणानं प्रियांका चोप्राशी आपलं लग्न झाल्याचा दावा केला आहे. एवढंच नाही तर या तरुणानं प्रियांकासोबतचा एक फोटो सुद्धा शेअर केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसं पाहायला गेलं तर हा किस्सा गंभीर नाही तर खूपच मजेदार आहे. या व्यक्तीचं म्हणणं आहे की त्यानं 2014 मध्ये प्रियांकाशी लग्न केलं आहे. प्रियांका चोप्राबाबत Brandon Schuster नावाच्या एका तरुणानं ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. Brandon Schuster ची ही पोस्ट अमेरिकन अभिनेत्री Chrissy Teigen रिट्विट केली आहे. या पोस्टमध्ये या तरुणानं प्रियांकासोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यात प्रियांकाच्या गळ्यात फुलांचा हार आहे आणि ती हसत हसत त्या तरुणाशी काहीतरी बोलताना दिसत आहे. या फोटोसोबत Brandon Schuster नं त्यावेळचा मजेदार किस्सा शेअर केला आहे जो ऐकल्यावर सर्वजण हैराण झाले आहेत. शूट संपलं की इरफानला खावी वाटायची पाणी पुरी, मुलानं शेअर केला थ्रोबॅक VIDEO

Brandon Schuster नं सांगितलं की, ‘2014 मध्ये मी प्रियांका चोप्राशी लग्न केलं होतं. मी ताम्पा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका इव्हेंटमध्ये तिचं स्वागत करताना तिच्या गळ्यात दोन फुलांचे हार घातले होते. त्यावेळी मला माहिती नव्हतं हे भारतीय संस्कृतीत लग्नाचं प्रतिक मानलं जातं. यानंतर भारतीय प्रसार माध्यमांमध्ये खळबळ उडाली होती आणि मी दुसऱ्या दिवशी एक्सक्ल्यूसिव्ह इंटरव्ह्यू देत होतो.’

Brandon Schuster ची ही ट्विटर पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. प्रियांकाचा हा किस्सा ऐकल्यावर सर्वच अवाक झाले आहेत. मात्र प्रियांकानं स्वतः यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जॅकी श्रॉफची लेक कृष्णाचा रोमँटिक अंदाज, बॉयफ्रेंडला Kiss करतानाचे फोटो व्हायरल मोबाइलचा अतिवापर पडला महागात, अभिनेत्री उर्वशी ढोलकियाला झाला गंभीर आजार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या