नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : पृथ्वीराज चौहान चित्रपटाच्या ट्रेलरची (Prithiviraj chauhan Teaser) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट रिलिज होताच या ट्रेलरला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या ट्रेलची सुरुवात पृथ्वीराज चौहान यांच्या कार्यापासून होते. सलामी देण्यासाठी तयार व्हा, हिंदुस्तानचा सिंह येत आहेत. हे सर्व डायलॉग सुरू असताना मागे मैदान दाखविलं जातं. या चित्रपटात सोनू सूद, मानुषी, संजय दत्त आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांची मुख्य भूमिका आहे. ( warrior Prithviraj Chauhan movie) डॉ. चंद्रप्रकाश त्रिवेदी हे चित्रपटाचे निर्माते असून मोठ मोठ्या दिग्गजांचा अभिनय यात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे 2017 मध्ये मिस वर्ल्ड झालेली मानुषी छिल्लर या चित्रपट संयोगिताची भूमिका साकारणार आहे आणि हा तिचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. हे ही वाचा- ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेत अमोल कोल्हेंची मुलगी दिसणार 2019 मध्ये निर्मांत्यांची चित्रपटाची घोषणा केली होती. कोरोना महासाथीपूर्वी काही भागाचं शूटिंग पूर्ण झालं होतं, मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन वाढवल्यामुळे शूटिंग रद्द करण्यात आलं होतं. मात्र आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.
चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय कुमार याने सांगितलं की, पृथ्वीराजचा टीजर चित्रपटाचा आत्मा आहे. महान योद्धे सम्राट पृथ्वीराज चौहान कधीच कशाला घाबरले नाही, आणि हाच त्यांच्या जिवनाचा सार आहे.