Prasad oak
मुंबई, 07 सप्टेंबर : मराठी चित्रपटसृष्टीतीळ २०२२ हे वर्ष प्रसाद ओकने गाजवलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या वर्षात तो दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून यशस्वी झाला. या दोन क्षेत्रात कौशल्य गाजवल्यानंतर आता प्रसाद ओक नवीन क्षेत्रात पाउल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच लेखक या रूपाने आपल्या भेटीस येणार आहे. प्रसाद ओकने आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित “माझा आनंद” हे पुस्तक लिहिलं आहे. लवकरच हे पुस्तक प्रकाशित होईल. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी प्रसादने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. आता न्यूज18 लोकमतच्या ‘बाप्पा मोरया’ या कार्यक्रमात प्रसादनं या पुस्तकाविषयी अनेक खुलासे केले आहेत. धर्मवीर आणि चंद्रमुखी हे चित्रपट प्रदर्शित होण्यात फक्त १५ दिवसांचं अंतर होतं. दोन्ही चित्रपटातील विविध भूमिका साकारणं प्रसादासाठी खूप आव्हानात्मक होतं. या प्रवासाबद्दलच ‘माझा आनंद’ हे पुस्तक असणार आहे असं प्रसादने बोलताना सांगितलं.तो म्हणाला, ‘हे दोन्ही चित्रपट साकारताना प्रचंड तारांबळ झाली. या सगळ्या तारंबळीचा प्रवास मी माझ्या आगामी पुस्तकात ‘माझा आनंद’ मध्ये मांडला आहे.’
या पुस्तकाला राजकारणाशी जोडले जात असताना त्याने एक खुलासा केला आहे. यावेळी तो म्हणाला कि, ‘हे पुस्तक राजकीय नाही. या पुस्तकाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. हे पुस्तक पूर्णपणे कलाक्षेत्राशी निगडित आहे. चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येकाला ‘धर्मवीर’ सारखा चित्रपट निर्माण करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे दाखवणारी आणि आमचा प्रवास सांगणारी कहाणी ‘माझा आनंद’ या पुस्तकात आहे.’ अशा शब्दात प्रसादने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हेही वाचा - Prasad Oak Exclusive : धर्मवीर नंतर ‘या’ प्रतिभावान कलाकारावर प्रसाद काढणार सिनेमा; समोर आल्या डिटेल्स चंद्रमुखी आणि धर्मवीरच्या अफाट यशनंतर प्रसाद ओक दिग्दर्शित नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवगंत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या आयुष्यावर आधारीत जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून प्रसादनं प्रोजेक्ट साइन केलं असून नव्या सिनेमाची घोषणा न्यूज18 लोकमतच्या बाप्पा मोरया या कार्यक्रमात प्रसादने केली आहे.