मुंबई, 09 फेब्रुवारी: बाहुबली चित्रपटातून सगळ्यांच्या मनात आणि घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी कायमच आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टींमुळे फॅन्समध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेत असते. बाहुबली चित्रपटाचा अभूतपूर्व यशानंतर कित्येक महिने तीचं नाव प्रभाससोबत जोडलं जात होतं. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र प्रभासने कॉफी विथ करण या शोमध्ये आपल्या मनातील उत्तर सांगून यासंदर्भातील चर्चांना पूर्णविराम दिला. ह्या अफवा आहेत असं काही नाही असं त्यावेळी प्रभासने सांगितलं होतं. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री अनुष्का शेट्टीचं नाव आता एका भारतीय क्रिकेटरसोबत जोडलं जात आहे. सध्या अनुष्का एका क्रिकेटरला डेट करत असल्याची चर्चा आहे. हेही वाचा- Love Story : …आणि विवाहित अनुपम खेर यांना स्वप्नातली राजकुमारी अखेर सापडली! हा क्रिकेटर साऊथचा नसून नॉर्थमधील असल्याचं सांगितलं जात आहे. हा क्रिकेटर नेमका कोण आहे याची उत्सुकता सर्वांनाच आहे मात्र अद्याप त्याचं नाव समोर येऊ शकलं नाही. ताजा रिपोर्टनं दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री अनुष्का शेट्टी सध्या भारतीय क्रिकेटरला डेट करत आहे. या क्रिकेटरसोबत लग्न करण्यासंदर्भातही अनेक चर्चा फिल्म इंडस्ट्रीमध्ये रंगत आहेत. सध्या अनुष्का शेट्टी आपल्या आगामी फिल्मच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘निशब्धम’ हा अनुष्काचा नवा सिनेमा येत आहे. हा सिनेमा सायलेंट थ्रिलर असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये अनुष्का म्यूट आर्टिस्ट म्हणून अभिनय करणार आहे. हा सिनेमा 21 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री अनुष्का शेट्टी सध्या या सिनेमाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. हेही वाचा- संजय दत्तची पत्नी मान्यताचा बोल्ड अंदाज, शेअर केले मालदीवमधील BIKINI PHOTOS