JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बाहुबली देणार 'भाईजान'ला टक्कर; सलमानच्या सिनेमाचं गणित बिघडवणार?

बाहुबली देणार 'भाईजान'ला टक्कर; सलमानच्या सिनेमाचं गणित बिघडवणार?

बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये दर महिन्याला चित्रपट प्रदर्शित होतात आणि कधीकधी ते बॉक्स ऑफिसवर एकमेकांशी टक्करही देतात. बॉक्स ऑफिसवर आता आणखी दोन मोठे सिनेमे टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

जाहिरात

सलमान खान, प्रभास

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 नोव्हेंबर: गेल्या बऱ्याच दिवसांपासून साऊथ सिनेमांची क्रेझ वाढलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे साऊथसमोर बॉलिवूड सिनेमांची जादू फिकी पडत असल्याचं म्हटलं जातंय. अशातच साऊथ वर्सेस बॉलिवूड असा नवा वाद निर्माण झालाय की काय? असाही प्रश्न आहेच. बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये दर महिन्याला चित्रपट प्रदर्शित होतात आणि कधीकधी ते बॉक्स ऑफिसवर एकमेकांशी टक्करही देतात. बॉक्स ऑफिसवर आता आणखी दोन मोठे सिनेमे टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेली पहायला मिळतेय. साऊथ सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पादुकोण यांचा चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ 2024 च्या ईदला रिलीज होणार आहे. त्याचवेळी, सलमान खान दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत एक चित्रपट करणार आहे आणि तो 2024 च्या ईदला प्रदर्शित होऊ शकतो, असं सांगितले जात आहे. त्यामुळे 2024 च्या ईदला प्रभास आणि सलमान खानमध्ये टक्कर होऊ शकते. हेही वाचा -  अमिताभ बच्चन चाहत्यांना भेटण्यापूर्वी चप्पल का काढतात? कारण आलं समोर पिंकविलाच्या अहवालानुसार, ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचे निर्माते चित्रपटाच्या रिलीजसाठी ईद 2024 वीकेंडचा विचार करत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षाच्या अखेरीस किंवा 2023 च्या सुरुवातीला पूर्ण होण्याची शक्यता आहे. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर, टीम पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये आणि VFX वर लक्ष केंद्रित करेल. निर्मितीची टाइमलाइन पाहता हा चित्रपट 2024 च्या उन्हाळ्यात सिनेमागृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

2009 पासून दरवर्षी सलमान खान ईदच्या मुहूर्तावर आपला चित्रपट प्रदर्शित करतो. सलमान खानचा ‘कभी ईद कभी दिवाळी’ हा चित्रपट आता 2023 च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. लमान खानचा पहिला ‘टायगर 3’ 2023 च्या ईदला रिलीज होणार होता. आता हा चित्रपट 2023 च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, प्रभास आणि सलमानने याविषयी अधिकृतरित्या काहीही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे खरंच दोघांचे सिनेमे 2024 च्या ईदच्या बॉक्स ऑफिसवर धडकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या