rakhi tandon
मुंबई, 5मे- टीव्ही जगातातील अशा काही भूमिका आहेत, ज्यांना विसरणं अशक्य आहे. आजही या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. काही वर्षांपूर्वी टीव्हीवरील ‘हम ‘पांच’ हा फॅमिली ड्रामा शोही असाच एक शो होता, जो लोकांना खूप आवडत होता. या शोमधील प्रत्येक कलाकाराला लोक आजही विसरलेले नाहीत. विशेषत: स्वीटी माथूरची व्यक्तिरेखा साकारलेली अभिनेत्री राखी टंडन हिला प्रेक्षक आजही मिस करतात. स्वीटीची भूमिका आजही लोकांच्या मनात कोरली गेली आहे. आता मात्र सर्वांच्या लाडक्या स्वीटीचा लूक खूप बदलला आहे. ‘हम ‘पांच’मध्ये विद्या बालन राधिकाच्या भूमिकेत दिसली होती. आता नक्कीच तुमच्या आठवणी ताज्या होतील. होय, चित्रपटां आधी विद्या ‘हम पांच’ या टीव्ही मालिकेत दिसली आहे. एकेकाळी झी टीव्हीचा हा एक प्रसिद्ध कॉमेडी शो होता.
माथूर कुटुंबाला 5 मुली होत्या आणि त्या सर्व जणी एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न होत्या. पण या पाच मुलींमध्ये सर्वात चुलबुली स्वीटी माथूर होती. कुरळे केस, गेटची बेल वाजताच नाचताना गेट उघडणं, राखीच्या स्टाईलने तिला या शोमध्ये वेगळं स्थान मिळवून दिलं. स्वीटीची भूमिकेनं मिळाली लोकप्रियता राखी टंडनने या मालिकेत स्वीटी माथूरची भूमिका साकारली होती. आता अनेक वर्षांनंतर तिचा संपूर्ण लूक बदलला आहे. राखी पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि ग्लॅमरस झाली आहे. राखी टंडनचा बदललेला लूक पाहून तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही. तिचा आताचा फोटो पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही की, ही तीच स्वीटी माथूर आहे.
या शोमधून केली करिअरची सुरूवात मुंबईत राहणाऱ्या राखी टंडनला सुरुवातीपासूनच अभिनय क्षेत्रात करिअर करायचं होतं. 1993 मध्ये डीडी नॅशनलवर प्रसारित होणाऱ्या ‘देख भाई देख’ या मालिकेतून तिनं आपल्या टेलिव्हिजन कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर 1995 मध्ये झी टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘हम पांच’मधून तिला मोठा ब्रेक मिळाला. या मालिकेतील तिची चुलबुली व्यक्तिरेखा लोकांना आवडली.