अभिनेत्री पूजा भट्टने तिच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोकळेपणाने संवाद साधला आहे.
अभिनेत्री पूजा भट्ट ही नेहमीच तिच्या प्रोफेशनल आयुष्याइतकीच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत राहीली आहे. पूजा बॉम्बे बेगम्स या सीरिजमुळे फारच चर्चेत आहे. पाहा पूजा तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली.
पूजाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यात तिने तिच्या दुसऱ्या लग्नावरही मोकळेपणाने संवाद साधला आहे. ती म्हणाली, "असं तर महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत, कोणत्याही बाबतीत पुरूषांच्या मागे नाहीत. पण या गोष्टीने काहीच फरक पडत नाही जेव्हा ती यशस्वी स्त्री आपल्या घरी पोहोचते. तेव्हा लोक म्हणतात हा ठिक आहे तु नोबल प्राईज जिंकलीस, पण जेवण्यासाठी काय आहे? तु एक आई आहेस की नाही? तुझं लग्न झालं आहे का?"
पूजा तिच्या दुसऱ्या लग्नाविषयी देखील बोलली. पूजाचं २००३ साली मनिष माखिजा याच्याशी लग्न झालं होतं. पण २०१४ साली ते विभक्त झाले होते. त्यानंतर पूजाने दुसरा विवाह केला नाही.
याविषयी बोलताना ती म्हणाली, "मला अनेकांनी विचारलं की तू दुसरं लग्न का करत नाहीस. तेव्हा मी त्यांना सांगते की फक्त आनंदात राहत होते एव्हढचं महत्त्वाचं नाही. कारण नेहमी खूश राहा हे जास्त महत्त्वाचं आहे. हे माझ्यासोबत घडलं आहे. आणि मी लोकांनाही हाच सल्ला देण्याचा प्रयत्न करते. यावाचून माझं जीवन अधुरं नाही. कारण माझं जीवन कसं जगायचं हे मी ठरवते."
पूजाने 'बॉम्बे बेगम्स' मधून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. ज्यात तिने एका बिजनेस वुमनची भूमिका साकरली होती. सीरिजच्या चांगल्या प्रतिसादाने पूजा फारच खूश आहे.