दिशा पाटणीचे (Disha Patani) जबरदस्त फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहेत. अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये पोज देताना काही फोटो शेअर केले आहेत, ते काही काळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले.
दिशा पाटणीने बॉलीवूडच्या काही चित्रपटांमध्येच काम केलं असेल, पण या अभिनेत्रीचे फॅन फॉलोइंग खूप आहेत. अभिनेत्री तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल तिच्या चाहत्यांना अपडेट करत असते. 'राधे'मध्ये काम केलेल्या अभिनेत्रीने लेटेस्ट फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. (सर्व फोटो क्रेडिट्स: dishapatani/Instagram)
दिशा पाटणी लाल रंगाच्या आउटफिटमध्ये तिचे बॉडी शेप्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फिटनेस फ्रीक दिशा पाटणीने जबरदस्त ग्लॅमरस आणि सुंदर फोटो शेअर केले आहेत.
दिशाने तिचे लांब केस खुले ठेवले आहेत आणि ग्लासी मेक-अपमध्ये ती सुंदर दिसत आहे. हे फोटोज शेअर करून तिने कॅप्शनमध्ये फक्त इमोजी टाकल्या आहेत.
दिशा पाटणीने इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये हे सिझलिंग फोटो शेअर केले, तेव्हा चाहत्यांनी तिला जोरदार पसंती देण्यास सुरुवात केली.
दिशा पाटणीने जेव्हा रेड स्ट्रॅपी ड्रेस परिधान करून मादक स्टाईलमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज दिली तेव्हा चाहत्यांनी 'रेड वाईन' म्हणत तिचं कौतुक केलं.
लाल रंगाच्या पोशाखात दिशा पाटणीची कडक पोज पाहून कोणाला भुरळ पडणार नाही? दिशाने पोजला खुलवणारे एक्सप्रेशन्सही दिले आहेत.
दिशा पाटणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'योद्धा' या अॅक्शन ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय, अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम यांच्यासह 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्येही ती दिसणार आहे. याशिवाय ती अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.