JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ऑनलाईन शॉपिंग करणं प्रसिद्ध अभिनेत्रीला भोवलं; 10 रुपयांच्या बदल्यात हजारोंचा गंडा

ऑनलाईन शॉपिंग करणं प्रसिद्ध अभिनेत्रीला भोवलं; 10 रुपयांच्या बदल्यात हजारोंचा गंडा

‘बिग बॉस’ फेम पायल रोहतगी ऑनलाइन फसवणुकीची शिकार झाली आहे. ऑनलाइन खरेदी करत असताना हजारोंचा गंडा घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात

पायल रोहतगी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 डिसेंबर : अनेक वेळा सामान्य नागरिकांसह सिनेसृष्टीतील कलाकारांची ऑनलाईन फसवणूक होताना पाहायला मिळते. आता अभिनेत्री पायल रोहतगी सोबत देखील असंच काही घडलं आहे. या अभिनेत्रीची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत  याविषयी माहिती दिली आहे.  पायल रोहतगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती बरेचदा आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकलेली आहे. पण आता एका पोस्टमधून पायल रोहतगीने ऑनलाइन खरेदी करत असताना हजारोंचा गंडा घालण्यात आल्याची माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पायल रोहतगीने वर्कआउटसाठी एका प्रसिद्ध ब्रँडकडून ऑनलाइन शॉपिंग केली होती. जेव्हा तिला ते कपडे मिळाल्यावर अभिनेत्रीला कपड्यांमध्ये साईजमध्ये समस्या येत होती. त्यानंतर पायलने वेबसाइटवर रिटर्नसाठी अर्ज केला. कंपनीतला एक माणूस आला आणि सामान परत घेऊन गेला  पण आता जवळपास १५-२० दिवस उलटून गेल्यावरही तिला रिटर्न प्रॉडक्ट्स मिळालेले नाहीत ना कंपनीत कोणताही कॉल आला. अशातच कंपनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तिला ब्रँडकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हेही वाचा - Bigg Boss 16: बिग बॉस 16 च्या फिनालेमधून सलमान खानची एक्झिट?; हा सेलिब्रिटी घेणार भाईजानची जागा पायलने सांगितले की जेव्हा ब्रँडकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा तिने कंपनीचा ग्राहक सेवा क्रमांक गुगल केला. यानंतर, अभिनेत्रीने कस्टर केअरशी तपशीलवार बोलले आणि तिच्या परताव्याच्या स्थितीबद्दल विचारले. त्यानंतर कस्टमर केअरने पायलला फॉर्म भरण्यास सांगितले. या फॉर्ममध्ये त्यांच्याकडून कार्डचे तपशीलही विचारण्यात आले, त्यामुळे ग्राहक सेवांनी नोंदणीसाठी 10 रुपये मागितले. अभिनेत्रीने Google Pay किंवा Paytm द्वारे 10 रुपये पाठवण्याविषयी बोलले, ज्यासाठी ग्राहक सेवेने नकार दिला. पराभव स्वीकारून पायलने कार्डचे तपशील भरले आणि तिने OTP सांगताच तिच्या खात्यातून 10 रुपयांऐवजी 20,238 रुपये काढण्यात आले.

पायल रोहतगीने यानंतर सायबर क्राइममध्ये तक्रार दाखल केल्यानंतर ती म्हणाली, ‘‘मला हे सांगायचं आहे की गुगल साइट्सवर फ्लॅश होणारे हे कस्टमर केअरचे नंबर आणि लिंक हे खरे नसतात. त्यावरून फसवणूक होते. माझा तर आता गुगलवर विश्वासच राहिलेला नाही. मी त्यासाठी सायबर क्राइमला फोन केला पण त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा कोणताच नंबर चालू स्थितीत नाही. त्यानंतर मी ऑनलाइन तक्रार दाखल केली. माझ्या सोशल मीडियावरूनही मी हे सर्वांना सांगितलं.’’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या