पावनखिंड ( Pawankhind) सिनेमानं मराठी सिनेमांचा दर्जा उंचावला. बॉक्स ऑफिसवर तूफान प्रतिसादानंतर १९ जूनला प्रवाह पिक्चरवर होणाऱ्या पावनखिंड सिनेमाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची (pawankhind world television premiere) सगळे वाट पाहत आहेत. मात्र त्याआधी सिनेमात बाजीप्रभूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते अजय पुरकर ( Ajay Purkar) यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलं घर बांधलं आहे. त्यांच्या घराचे फोटो समोर आले असून अजय पुरकर यांचं शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंवर असलेलं प्रेम दिसून आलं आहे.
शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाचा त्रिवेणी संगम असलेल्या पावनखिंड सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.
छत्रपती शिवाज महाराज आणि बाजीप्रभूंच्या प्रेमापोटी अभिनेते अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे.
ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर असावं अशी त्यांची इच्छा होती आणि अखेर ते स्वप्न पूर्ण झालं आहे.
बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची पाटी दिमाखात मिरवल्यानंतर सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या १९ तारखेला प्रवाह पिक्चर या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
जितका प्रतिसाद प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर दिला तितकाच प्रतिसाद ते वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरलाही देतील अशी भावना अजय पुरकर यांनी व्यक्त केली.
पावखिंड सिनेमात अजय पूरकर यांनी साकारलेले बाजीप्रभू रसिक प्रेक्षकांच्या मनावर मोठी छाप पाडून गेले. त्यांच्या या भूमीकेसाठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.