पठाण
मुंबई, 4 जानेवारी- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट पठाण रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे हा चित्रपट वादात अडकला आहे. परंतु या प्रकरणानंतर गाण्याचे व्ह्यूज प्रचंड वाढले आहेत. या गाण्याला अत्तापर्यंत जवळजवळ 170 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांनतर आता चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांच्या आगामी पठाण या चित्रपटाच्या अडचणी काही संपताना दिसून येत नाहीत. एकापाठोपाठ एक मेकर्ससमोर समस्या निर्माण होत आहेत. या चित्रपटातील गाण्याला रिलीजनंतर प्रचंड विरोध करण्यात आला होता. त्यांनतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीजपूर्वीच लीक झाल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. **(हे वाचा:** Gandhi Godse Ek Yudh Teaser : ‘पठाण’ला टक्कर देण्यासाठी ‘गांधी गोडसे’ सज्ज; धमाकेदार टीझर प्रदर्शित ) सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान जबरदस्त ऍक्शन करतांना दिसून येत आहे. काही युजर्सनी हा व्हिडीओ शेअर करत हा पठाणचा ट्रेलर असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ समोर येताच मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर विविध चर्चा सुरु आहे. व्हिडीओला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. मात्र या सर्व प्रकरणावर मेकर्सनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचे चाहते. या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. मात्र या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या बिकिनीवरुन प्रचंड वाद निर्माण झाला होता. विविध स्थरातून संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर येत्या 10 जानेवारीला रिलीज करण्यात येणार होता. मात्र तत्पूर्वीच ट्रेलर लीक झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत मेकर्सनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय. हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.