JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सिद्धू मुसेवाला आता आमच्या शरीराचाच एक भाग, भावनिक चाहत्यांची अनोखी श्रद्धांजली

सिद्धू मुसेवाला आता आमच्या शरीराचाच एक भाग, भावनिक चाहत्यांची अनोखी श्रद्धांजली

Sidhu Moosewala Tattoos : क्लब ऑपरेटर गौरव म्हणतो की, अनेक तरुण सिद्धू मूसेवालाचे फॅन्स आहेत. त्याच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी आम्ही त्याचे टॅटू काढण्याची मोहीम राबवली, ज्याचं लोकांनी कौतुक केले. आता तरुणांमध्ये त्याच्याबद्दल जो जोश दिसत आहे, तो आश्चर्यकारक आहे.

0106

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाबद्दल हरियाणातील तरुणांमध्ये जोरदार चर्चा आहे. सिद्धूचे चाहते त्याच्या शरीरावर कायमस्वरूपी टॅटू बनवून घेत आहेत. रोहतकमधील एक टॅटू आर्टिस्ट सिद्धू मूसेवालाचं मोफत टॅटू बनवत आहे आणि आता स्थिती अशी झाली आहे की, त्याच्याकडे 15 जुलैपर्यंत वेळ नाही. दररोज मोठ्या संख्येने लोक येत आहेत. परंतु, तो दिवस आणि रात्रीत तीन ते चार टॅटू बनवू शकतो.

जाहिरात
0206

सिद्धू मूसेवाला याच्या निधनानंतर लोक त्याला वेगवेगळ्या प्रकारे श्रद्धांजली वाहत आहेत. काही जण सिद्धू मुसेवालाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी निदर्शने करत आहेत. तर, काहींनी कँडल मोर्चा काढून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. रोहतकमधील एका क्लबनेही अनोख्या पद्धतीने सिद्धू मुसेवालाला श्रद्धांजली वाहिली आहे. क्लबने सिद्धू मूसेवालाचा टॅटू फ्री बनवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर केवळ हरियाणाच नाही तर दिल्ली, पंजाब आणि राजस्थानमधूनही लोक टॅटू काढण्यासाठी पोहोचत आहेत.

जाहिरात
0306

हे पोर्ट्रेट टॅटू आर्टिस्ट 15 ते 20 हजार रुपयांमध्ये बनवलं जातं. ते हल्ली मोफत बनवलं जात आहे. टॅटू आर्टिस्ट सुशांत सांगतो की, त्याने त्याच्या आयुष्यात असा पॅशन कधीच पाहिला नाही. लोक टॅटू काढण्यासाठी त्याच्याकडे लांबून येत आहेत आणि काही क्षणात टॅटू बनवणाऱ्यांचे डोळे पाणावल्याचेही पाहायला मिळतं.

जाहिरात
0406

क्लबचे संचालक गौरव सांगतात की, सिद्धू मुसेवाला हा तरुणांमध्ये लोकप्रिय होता. त्याच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतला, ज्याचं लोकांनी कौतुक केले आणि त्याच्याबाबतीत तरुणांमध्ये जो जोश दिसला, तो आश्चर्यकारक आहे.

जाहिरात
0506

गेल्या 4 दिवसांपासून रोज येत असलेल्या मनदीप सिंगचा अखेर नंबर आला, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने सांगितलं की, मला सिद्धू मूसेवालाला भेटायचं होतं आणि त्याच्या गावात जाण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु, काही कारणास्तव जाऊ शकलो नाही. आता तो या जगात नसल्याचं मला खूप वाईट वाटतं. पण आता मी त्याच्या आठवणींमध्ये आयुष्य घालवणार आहे आणि हा टॅटू म्हणजे त्याला माझी श्रद्धांजली आहे आणि आता तो नेहमीच माझ्यासोबत असेल.

जाहिरात
0606

राजस्थानमधील गंगानगर येथून आलेला निखिल सांगतो की, तो सकाळी 6.30 वाजता घरातून बाहेर पडला आणि ट्रेनने येथे पोहोचला. मूसेवालाच्या आठवणी कधीच विसरता येणार नाहीत. आता थोडा दिलासा असेल की तो माझ्या शरीराचा एक भाग म्हणून कायम माझ्यासोबत असेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या