JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Parveen Babi: 'उलगडणार मृत्यूचं कोडं?' परवीन बाबीवर बनणार बायोपिक; 'ही' अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत

Parveen Babi: 'उलगडणार मृत्यूचं कोडं?' परवीन बाबीवर बनणार बायोपिक; 'ही' अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत

A biopic will be made on Parveen Babi: हिंदी सिनेसृष्टीतील एक अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री परवीन बाबी यांच्या आयुष्यावर आता बायोपिक बनवली जात आहे.

जाहिरात

परवीन बाबीवर बनणार बायोपिक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,4 जून- मनोरंजनसृष्टीत अनेक वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या व्यक्तींवर बायोपिक्स बनत आल्या आहेत. या बायोपिक्समधून चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारांबाबत माहिती नसलेली तथ्ये आणि त्यांच्या आयुष्यात घडलेला प्रत्येक घटना पडद्यावर पाहण्याची संधी मिळते. त्यामुळे चाहते नेहमीच बायोपिक्सना पसंती दर्शवत असतात. अशातच आता बॉलिवूडमध्ये आणखी एका बायोपिक्सची जडणघण सुरु झाली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील एक अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री परवीन बाबी यांच्या आयुष्यावर आता बायोपिक बनवली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अबिनेटरी परवीन बाबी यांच्यावर बायोपिक बनणार असल्याची चर्चा सुरु होती. यामध्ये एका अभिनेत्रीचं नाव आघडीवर होतं. हीअभिनेत्री इतर कुणी नसून उर्वशी रौतेला होय. उर्वशी रौतेला आगामी काळात परवीन बाबी यांच्या बायोपिकमध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु याबाबत काहीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. उर्वशी रौतेला पोस्ट- दरम्यान आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाने एक फोटो शेअर करत या या गोष्टींना कन्फर्म केल्याचं दिसून येत आहे. उर्वशीने नुकतंच इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये अभिनेत्री परवीन बाबी यांच्याबाबत एक पॅराग्राफ लिहलेला दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत उर्वशीने एक कॅप्शनसुद्धा लिहलं आहे. यामध्ये तिने अभिमान वाटण्याबाबत म्हटलं आहे. तसेच उर्वशीने आयुष्यात एक नवी सुरुवात होत असल्याचं म्हटलं आहे. उर्वशीला परवीन बाबींच्या बायोपिकमध्ये पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परवीन बाबी यांच्या बायोपिकबाबत मिळालेल्या नाहीयेत. त्यामुळे उर्वशी रौतेलाच्या या पोस्टचा अर्थ आहे? आणि खरंच असा काही प्रोजेक्ट असेल तर ती यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

परवीन बाबींचा रहस्यमयी मृत्यू- परवीन बाबी या एक राजघराण्यातील लेक होत्या. त्यांच्याकडे अफाट संपत्ती होती. पडद्यावर दिग्गज अभिनेत्यांसोबत रोमान्स करणाऱ्या परवीन यांचं खाजगी आयुष्य फारच दुःखद होतं. त्यांच्या आयुष्यात अनेक अभिनेते आले मात्र एकासोबत त्यांना संसार थाटता आला नाही. त्या आयुष्यभर जोडीदारासाठी धडपडत राहिल्या. अगदी तरुण वयातच त्यांचं निधन झालं होतं. दुर्दैव म्हणजे त्या आपल्या राहत्या घरात तीन दिवस मृत पडल्या होत्या. त्यांचं निधन एक रहस्यमयी घटना समजलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या