JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / पाकिस्तानी मॉडेलची घरात घुसून हत्या; तपासात धक्कादायक सत्य आलं समोर

पाकिस्तानी मॉडेलची घरात घुसून हत्या; तपासात धक्कादायक सत्य आलं समोर

पाकिस्तानी मॉडल नायब नदीमची (Nayab Nadeem) तिच्या राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आली आहे.

0107

पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल नायाब नदीम (Nayab Nadeem) हीची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. नायाब नदीम (Nayab Nadeem) मर्डर केसमध्ये पोलिसांनी सांगीतलं आहे की त्यांनी संशयीत आरोपीला पकडलं आहे. तो अनेक दिवसांपासून नायाबचा पाठलाग करत होता. तर सीसीटिव्ही फुटेजमध्ये तो तिच्या घराच्या आसपास भटकतानाही दिसला आहे.

जाहिरात
0207

29 वर्षीय मॉडेल नायब नदीम लाहौरच्या पॉश डिफेन्स हाउसिंग अथॉरिटी फेज 5 मध्ये राहत होती. पोलिसांना संशय आहे की नायबची हत्या गळा दाबून करण्यात आली. सोमवारी तिचं पार्थिव कुटुंबियाकडे सोपवण्यात आलं.

जाहिरात
0307

पाकिस्तानी मीडिया वृत्तानुंसार नायब विनाकपडे मृत अवस्थेत सापडली होती. मात्र तिच्यावर बलात्कार झाला नव्हता, तर ही हत्या बलात्कारातून झाल्याचं भासवण्यासाठी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

जाहिरात
0407

पोलिसांनी तिची कार ताब्यात घेतली असून तिच्या मोबाईलचा डेटाही तपासला जात आहे.

जाहिरात
0507

पोलिस तिच्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहे. ज्यात तो संशयीत व्यक्ती घराच्या आजूबाजूला भटकताना दिसत आहे.

जाहिरात
0607

नायबचा भाऊ मोहम्मद अलीने सांगीतलं की 9 जुलै ला अर्ध्या रात्री तो बहिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला असता. त्याला ती मृतअवस्थेत सापडली. तिच्या मानेलाही जखम झाली होती.

जाहिरात
0707

अलीने सांगीतलं कि बाथरूमची खिडकी तुटलेली होती. ज्यातून संशय व्यक्त केला जात आहे की तो गुन्हेगार खिडकीतून गेला आणि आला असावा. अली नेहमी आपल्या बहिणीला भेटायला तिच्या घरी जायचा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या