पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरवर (Saba Qamar) लाहौर कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे.
दिवंगत अभिनेता इरफान खानचा (Irrfan Khan) चित्रपट ‘हिंदी मीडियम (Hindi Medium)’ मधून बॉलवूडमध्ये पाय ठेवणारी पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर (Saba Qamar) सध्या पाकिस्तानात चर्चेत आहे. तिच्यावर कोर्टाकडून अरेस्ट वॉरंट जाहीर केलं आहे. पाहा काय केलंय अभिनेत्रीने.
पाकिस्तानातील एक स्थानिक न्यायालयाने हे वॉरंट काढलं आहे. तिच्यावर आरोप आहे की तेथील एका ऐतिहासिक मस्जिदीत तिने डान्स व्हिडीओ शुट केला.
दोघेही अनेक दिवस या प्रकरणातून वाचण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पीटीआईने दिलेल्या रिपोर्टनुसार कोर्टाने पुढील तारीख ३ ऑक्टोबर दिली आहे.
लाहौर पोलिसांनी मागील वर्षी सबा आणि बिलाल यांच्यावर हा गुन्हा दाखल केला होता. ऐतिहासिक मस्जिदीला अपवित्र केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला.
सबाच्या या व्हिडीओनंतर स्थानिक लोकांनीही सबाचा मोठा विरोध केला होता. सोशल मीडियावरही त्यांच्यावर खूप टीका झाली होती.
अभिनेत्रीने सांगितलं की, हा एक निकाह वाला संगीत ट्रॅक होता. ज्यात कोणतंही प्लेबॅक म्युझिकसोबत शुट केलं नव्हतं.
पाकिस्तानची बोल्ड अभिनेत्री म्हणू सबाची ओळख आहे. हिंदी, पाकिस्तानी आणि तुर्की सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.