भरत जाधव, श्रेयस तळपदे, लक्ष्मीकांत बेर्डे, मेघा घाडगे, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर यांची तगडी स्टार कास्ट असलेला पछाडलेला ( Pachadlela) या मराठीतील सुपरहिट सिनेमातून ‘सूड दुर्गे सूड’ हा प्रसिद्ध डायलॉग सर्वांनाच आठवत असेल. दुर्गा म्हणजेच दुर्गा मावशीनं म्हणजेच अभिनेत्री वंदना गुप्ते ( Vandana Gupte) हिनं तेव्हा धम्माल उडवून दिली होती. दुर्गेची लेक मनिषा ही प्रेक्षकांना आठवत असेल. अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी ( Ashwini Kulkarni) पछाडलेला सिनेमानंतर सिनेक्षेत्रात फारशी दिसली नाही. आता अभिनेत्री फारच बदलली असून तिचा बदलेला लुक एकदा पाहाच.
पछाडलेला सिनेमातील दुर्गा मावशीची लेक मनिषा आणि श्रेयस तळपदे यांची भन्नाट लव्ह स्टोरी पाहायला मिळाली होती.
पछाडलेला सिनेमानंतर मात्र अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी सिनेक्षेत्रातून गायब झाली. पण तिची मनिषा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली.
काही महिन्यांपूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नाय वरण भात लोनचा कोन नाय कोनचा' या सिनेमात अश्विनी दिसली होती.
दिग्याच्या काकीच्या भूमिकेत अश्विनी आपल्याला दिसली होती. तिच्या या भूमिकेची प्रचंड चर्चा देखील झाली होती.
त्याचप्रमाणे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याच्या फत्तेशिकस्त या सिनेमातही अश्विनीने लहान भूमिके साकारली होती.