ऑस्कर पुरस्कार
मुंबई, 11 मार्च- सध्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या पुरस्कार सोहळ्याला आता फारच कमी वेळ शिल्लक आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये रविवारी, 12 मार्चला ऑस्करचा बहुप्रतीक्षित सोहळा पार पडणार आहे. यावेळचा ऑस्कर सोहळा भारतासाठीही अतिशय खास आहे. कारण यंदा एसएस राजामौली यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘आरआरआर’ ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे. सोबतच या सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. या पुरस्कार सोहळ्यात तब्बल 62 वर्षानंतर एक बदल दिसून येणार आहे. पाहूया यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात काय नवीन असणार आहे. कोणताही पुरस्कार सोहळा म्हटलं की सर्वांना आधी रेड कार्पेट आठवतो. रेड कार्पेट आणि पुरस्कार सोहळा हे एक समीकरणचं बनलं आहे. प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटला मोठं महत्व आहे. याच रेड कार्पेटवर मोठं-मोठे सेलिब्रेटी आपल्या ग्लॅमरचा जलवा दाखवताना दिसून येतात. त्यामुळे रेड कार्पेटचा थेट संबंध ग्लॅमरसोबत जोडला जातो. रेड कार्पेटवर जगभरातील सेलिब्रेटी हटके-हटके फॅशन दाखविताना दिसून येतात. परंतु यंदा ऑस्कर सोहळ्यात कार्पेटचा रंग लाल नसणार आहे. (हे वाचा: Ananya Pandey: अनन्या पांडेची बहीण विदेशी बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ; प्री-वेडिंग फंक्शनमध्ये भाऊ-बहिणींची धम्माल ) ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी कार्पेटचा रंग रेड असतो. परंतु यंदा 62 वर्षानंतर यामध्ये बदल करण्यात येत आहे. हे वाचून सर्वानांच आश्चर्य वाटेल कि, यावर्षी सोहळ्यात रेड कार्पेट पाहायला मिळणार नाही. 62 वर्षानंतर या कार्पेटचा रंग बदललेला दिसून येणार आहे. यामागे कारणसुद्धा असंच आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर चालणं हे प्रत्येक सेलिब्रेटीचं स्वप्न असतं. पण यावेळी रेड कार्पेटचा रंग बदलण्यात येणार आहे. 1961 पासून म्हणजेच 33 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यापासून प्रत्येक वेळी रेड कार्पेट घालण्यात आलं आहे. मात्र आता ही परंपरा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्करचं आयोजन करणाऱ्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्सने यावेळी लाल रंगाऐवजी चमकदार पांढरा रंग म्हणजेच ‘शॅम्पेन’रंगाची निवड केली आहे.
12 मार्च रोजी लॉस एंजेलिसमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.जगभरातील दिग्गज सेलिब्रेटींसोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रेझेंटेटर म्हणून उपस्थित असणार आहे. दीपिका ऑस्कर पुरस्कार प्रदान करणारी तिसरी भारतीय महिला असणार आहे. यापूर्वी 2016 मध्ये, प्रियांका चोप्रा तर सर्वात पहिल्यांदा पर्सिस खंबाटा यांनी पुरस्कार प्रदान केला होता.