JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / शवपेट्यांना पॉलिश करायचं तर कधी दूधवाल्याचं काम करायचा पहिला जेम्स बाँड; हलाखीच्या परिस्थितीतून झाला सुपरस्टार

शवपेट्यांना पॉलिश करायचं तर कधी दूधवाल्याचं काम करायचा पहिला जेम्स बाँड; हलाखीच्या परिस्थितीतून झाला सुपरस्टार

Sean Connery (1930-2020) अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जगातला सर्वात लोकप्रिय सुपरस्टार कसा जन्माला आला? शॉन कॉनेरी यांच्या आयुष्यातल्या अपरिचित 7 गोष्टी

0108

जगातला सर्वात लोकप्रिय अभिनेता असं बिरूद मिळवलेला हा sexiest man on earth एके काळी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत झोपडपट्टीसारख्या वस्तीत राहायचा, हे सांगून खरं वाटणार नाही. बाँड जिवंत करणारे सर शॉन कॉनेरी यांचं 90 व्या वर्षी निधन झालं. एजंट 007 च्या आयुष्याच्या फारशा परिचित नसलेल्या 7 गोष्टी..

जाहिरात
0208

Sean Connery यांचा जन्म 1930 मध्ये स्कॉटलंडमधल्या एडिंबरा शहरात झाला. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमुळे ते शवपेट्यांना पॉलिश करायचं काम करायचे. कधी दूधवाला, तर कधी लाईफगार्ड म्हणूनही त्यांनी काम केलं. पण बॉडीबिल्डिंगची त्यांची आवड त्यांना चंदेरी दुनियेपर्यंत घेऊन गेली.

जाहिरात
0308

पडद्यावर 007 या ब्रिटीश एजंटाची भूमिका वठवणारा आणि सुंदर ललनांना लीलया खेळवणारा जेम्स बाँड खऱ्या अर्थाने शॉन कॉनेरी यांनी उभा केला. पण याच भूमिकेत अडकल्याने कॉनेरी जेम्स बाँडचा तिरस्कार करत.

जाहिरात
0408

पृथ्वीवर जिवंत असणारा सर्वात सेक्सी पुरुष असं बिरुद पीपल मॅगझीनने शॉन यांना दिलं तेव्हा ते 59 वर्षांचे होते. ऑस्कर, गोल्डन ग्लोब, बाफ्ता असे सर्व मानाचे पुरस्कार कॉनेरींनी खिशात घातल होते.

जाहिरात
0508

बाँड...जेम्स बाँड अशी ओळख सांगणारा हा कलाकार कट्टर स्कॉटिश होता. स्कॉटलंडला स्वातंत्र्य मिळावं अशी त्यांची भूमिका होती आणि Scotland Forever असं लिहिलेलं टॅटूही त्यांनी दंडावर काढून घेतलं होतं.

जाहिरात
0608

चार दशकं मोठा पडदा गाजवल्यानंतर ते जगातले सर्वात लोकप्रिय अभिनेते ठरले होते. लागोपाठ 7 बाँडपटांमुळे त्यांची छबी 007 अशीच कोरली गेली. बाँडपटांखेरीज रेड ऑक्टोबर, इंडियाना जोन्स आणि लास्ट क्रूसेडसारख्या इतर चित्रपटांमध्येही त्यांनी लक्षात राहणाऱ्या भूमिका निभावल्या.

जाहिरात
0708

बाँडपटांमध्ये आवश्यक असलेले सगळे गुण कॉनेरी यांच्याकडे होते. आवाज, देहबोली आणि आकर्षक चेहरा, उंची या जोरावरच सेक्सिएस्ट मॅन ऑन अर्थ म्हणून त्यांची गणना होत असे.

जाहिरात
0808

इयान फ्लेमिंग यांच्या काल्पनिक पात्रावर आधारित Dr. No नावाच्या चित्रपटात 1962 मध्ये त्यांनी पहिल्यांदा जेम्स बाँड उभा केला. 7 बाँडपटांची मालिकाच त्यांनी केली. पुढे पीअर्स ब्रॉस्ननसारखे काही वेगळे जेम्स बाँड आले, पण शॉन कॉनेरी यांची छबी कायम रसिकांच्या मनात पहिला बाँड अशीच राहील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या