nusrat jahan निखिलशी लग्न करण्याचा निर्णय नुसरतने फार आधीच घेतला होता. खासदार झाल्यानंतर तिने फक्त आपल्या निर्णयाची घोषणा केली.
लाखो चाहत्यांच्या हृदयात राज्य करणारी बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहांने तुर्कीत डेस्टिनेशन वेडिंग केल्यानंतर नुकतीच ती भारतात परतली.
नुसरत आणि निखिल जैनने १९ जूनला हिंदू पद्धतीने लग्न केलं. तर २० जूनला ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. त्यांच्या ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लग्नानंतर दोघांनी बीच पार्टीही दिली होती.
नुसरत एक मॉडेल आणि अभिनेत्री असून पश्चिम बंगालच्या बशीरहाट येथीन ती खासदार म्हणून निवडून आली आहे. तर निखिल कोलकतामधील प्रसिद्ध व्यावसायिक आहे. खासदार झाल्यावर लगेच नुसरतने तिच्या लग्नाची घोषणा केली होती. दोघांनी सुरुवातीला त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आणि सोशल मीडियावर आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या आणा भाका घेतल्या.
या दोघांची लव्ह स्टोरी फार फिल्मी आहे. त्यांची पहिली भेट २०१८ मध्ये दुर्गा पूजे दरम्यान झाली. अवघ्या सहा महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
निखिलशी लग्न करण्याचा निर्णय नुसरतने फार आधीच घेतला होता. खासदार झाल्यानंतर तिने फक्त आपल्या निर्णयाची घोषणा केली.