JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / विदेशातील लग्न भारतात अमान्य?; नुसरतप्रमाणे 'या' सेलिब्रिटींनीही बांधली विदेशात लग्नगाठ

विदेशातील लग्न भारतात अमान्य?; नुसरतप्रमाणे 'या' सेलिब्रिटींनीही बांधली विदेशात लग्नगाठ

तृणमुल काँग्रेसची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहांच्या विवादीत लग्नांनतर अनेक सेलिब्रिटींनी विदेशात लग्न केल्याची आठवण नेटकऱ्यांना होतं आहे. पाहा कोण आहेत हे सेलिब्रिटी.

0108

तृणमुल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहांने (Nusrat Jahan) निखिल जैन सोबत तुर्कीत विवाह केला होता. पण आता त्यांच्यातील विवादानंतर नुसरतने हे लग्नचं अमान्य ठरवलं आहे. तुर्कीच्या नियमांप्रमाणे हे लग्न अधिकृत आहे मात्र भारतात हे वैध नसल्याचं नुसरत म्हणाली. पण असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी विदेशात लग्नगाठ बांधली होती. पाहा कोण आहेत हे सेलिब्रिटी.

जाहिरात
0208

बॉलीवूडचं पॉवरकपल म्हणून ओळखले जाणारे दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंगने इटलीच्या लेक कोमो रिसॉर्टवर धुमधडाक्यात लग्न केलं होतं. त्यानंतर भारतात रिसेप्शन पार्टी दिली होती.

जाहिरात
0308

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनीही इटलीत शानदार विवाहसोहळा केला होता. त्यानंतर भारतात रिसेप्शन पार्टी दिली होती.

जाहिरात
0408

बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने अमेरिकेत लग्न केलं होतं. कारण तिचा पतीही अमेरिकन आहे.

जाहिरात
0508

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनीही इटलीत अगदी वैयक्तितरित्या विवाह केला होता.

जाहिरात
0608

अभिनेत्री सुरवीन चावलाने अक्षय ठक्कर सोबत एका प्रायव्हेट सेरेमनीत इटलीत विवाह केला होता.

जाहिरात
0708

बॉलीवूड अभिनेता आफताब शिवदासनी आणि निन दुसांजने श्रीलंकेत विवाह केला होता. त्यानंतर भारतातही त्यांनी लग्न रजिस्टर केलं होतं.

जाहिरात
0808

बॉलीवूडचे प्रसिद्ध प्रोड्यूसर, दिग्दर्शक बोनी कपूरचा भाचा आणि अभिनेता मोहित मारवाहने अंतरा मारवाह सोबत दुबईत विवाह केला होता. त्यावेळी अभिनेत्री श्रीदेवीही उपस्थित होत्या.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या