JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / नीता अंबानींच्या कल्चर सेंटरमध्ये पोहोचले देशविदेशातील सेलिब्रिटी; कोणीकोणी लावली उपस्थिती पाहा

नीता अंबानींच्या कल्चर सेंटरमध्ये पोहोचले देशविदेशातील सेलिब्रिटी; कोणीकोणी लावली उपस्थिती पाहा

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर म्हणजेच NMACC चे भव्य उद्घाटन होत आहे. यासाठी देशविदेशातील दिग्गज, सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मार्च : आज नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर म्हणजेच NMACC चे भव्य उद्घाटन होत आहे. यासाठी देशविदेशातील दिग्गज, सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं आहे. बॉलिवूडसह हॉलिवूड कलाकारही या कार्यक्रमासाठी मुंबईत आले आहेत. या कार्यक्रमासाठी कोणकोणत्या सेलिब्रिटींनी हजेर लावली ते पाहुयात. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी आणि त्यांची मुलगी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) संचालक ईशा अंबानी कार्यक्रमस्थळी पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत अजय पिरामलही दिसले. आकाश अंबानी पत्नी श्लोका अंबानींसोबत, तर अनंत अंबानी त्यांची होणारी बायको मंगेतर राधिका मर्चंट यांच्यासोबत कार्यक्रमात पोहोचले. संपूर्ण अंबानी कुटुंब इथं आलं आहे. नीता अंबानीचं कल्चरल सेंटर पाहूनच दिपतील डोळे; NMACCचे Inside Photo इतर बड्या व्यक्तीही इथे पोहोचू लागल्या. पाहुण्यांची लांबलचक यादी असली तरी. मुख्य नावांचा उल्लेख करताना यामध्ये टॉम हॉलंड, अभिनेत्री झेंडया, अनुष्का दांडेकर, उद्धव ठाकरे कुटुंब, युवराज सिंग आणि पत्नी हेजल कीच, राहुल वैद्य, दिशा परमार, अभिनेत्री सोनम कपूर, स्पायडरमॅन चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या नीतू कपूर यांचा समावेश आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत.

मुकेश अंबानी, ईशा अंबानी आणि अजय पिरामल यांच्यासोबत.

आकाश अंबानी पत्नी श्लोका अंबानींसोबत कार्यक्रमस्थळी पोहोचले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या