‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या टीव्ही शो ने गेलया 13 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शोमधील प्रत्येक पात्र खास आहे. चाहत्यांना या पात्रांचया खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. या शोमध्ये ‘दयाबेन’ अर्थात दिशा वकानीची व्यक्तिरेखा सर्वाधिक पसंत केली. काही वर्षांपासून ती या शोपासून दूर आहे, पण आजही तिच्या लोकप्रियतेत काही फरक पडलेला नाही. दरम्यान दयाबेन उर्फ दिशाची नेटवर्थ (Disha Vakani Net Worth) वाचून तुम्हाला आश्चर्य नक्की वाटेल
दिवाळी (Diwali 2021) हा सण दिव्यांचा-प्रकाशाचा. या सणादरम्यान वैभव, संपत्ती या बाबींनाही तेवढेच महत्त्व आहे. दिवाळीच्या या सणादरम्यान जाणून घेऊया 'तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)' फेम दयाबेन उर्फ दिशा वकानी (Disha Vakani) हिच्याकडे किती संपत्ती आहे. या अभिनेत्रीची संपत्ती वाचून तुम्ही देखील म्हणाल- हे माँ माता जी..
'तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)' ची दयाबेन बऱ्याच काळापासून शोमध्ये नाही आहे. पण आपल्या व्यक्तिरेखेने दिशाने लोकांच्या मनात अशी प्रतिमा निर्माण केली की तिचे प्रत्येक संवाद आजही चाहत्यांना आठवतात.
बॉलिवूड लाईफमधील एका रिपोर्टनुसार, 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या एका एपिसोडसाठी दयाबेनला एक ते दीड लाख रुपये मानधन देण्यात आले होते. यामुळे 2017 मध्ये तिला दर महिन्याला 20 लाख रुपये मिळत होते.
टीव्ही प्रेक्षकांमध्ये दिशाच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर तिला अनेक टीव्हीसी आणि ब्रँड्सही मिळत होते.
दिशाने नाट्यकलेचे शिक्षण घेतले आहे. तिने 2015 मध्ये मयूर पहाडी यांच्याशी लग्न केले. नोव्हेंबर 2017 मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतरच दिशाने शोमध्ये काम करणे बंद केले होते.
दिशा वकानीने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती 'देवदास', 'मंगल पांडे: द रायझिंग', 'जोधा अकबर', 'सी कंपनी', 'लव्ह स्टोरी 2050' मध्येही दिसली आहे.