JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Netflix ची धमाकेदार घोषणा! 17 ओरिजिनल चित्रपट-सीरिज करणार प्रदर्शित

Netflix ची धमाकेदार घोषणा! 17 ओरिजिनल चित्रपट-सीरिज करणार प्रदर्शित

प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्स (Netflix) एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 17 नवे कार्यक्रम घेऊन येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै : नेटफ्लिक्सने कोरोनाकाळात प्रेक्षकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळे अनेक चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित न होता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. दरम्यान प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्स एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 17 नवे कार्यक्रम घेऊन येत आहे. नेटफ्लिक्सवर 17 नवीन प्रोग्राम येणाऱ्या काळात भारतीयांना पाहायला मिळणार आहेत. भारतीय इंडस्ट्रीमध्ये नेटफ्लिक्सवरील कंटेटसाठी दोन वर्षांसाठी 3000 कोटींची रक्कम गुंतवण्यात आल्याची माहिती नेटफ्लिक्सचे संस्थापक Reed Hastings यांनी त्यांच्या मागील भारत दौऱ्यादरम्यान सांगितले होते. यामध्ये अनुराग बासू यांचा राजकुमार राव, अभिषेक बच्चन स्टारर ‘लुडो’, संजय दत्त स्टारर ‘टोरबाज’,  राधिका आपटे आणि नवाझुद्दीन सिद्दिकी यांचा थ्रिलर ‘रात अकेली है’, कोंकणा सेन आणि भूमि पेडणेकर यांचा ‘डॉली किट्टी और चमकते सितारे’, यामी गौतम आणि विक्रांत मैसीचा ‘गिन्नी वेड्स सनी’ हे चित्रपट नेटफ्लिक्सवर चाहत्यांच्या मनोरंजनासाठी येणार आहेत.

याशिवाय काही हटके चित्रपट घेऊनही नेटफ्लिक्स येत आहे. जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’, काजोलचा Tribhanga: Tedhi Meri Crazy, शबाना आझमी यांचा हॉरर चित्रपट ‘काली खुही’, नवाझचा  ‘सीरियस मेन’ हे चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. याशिवाय काही भन्नाट कंटेट घेऊन नेटफ्लिक्स येत आहे. काही धमाकेदार वेबसीरिज देखील चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. मीरा नायर दिग्दर्शित आणि तब्बू-इशान खट्टर स्टारर ‘ए सुटेबल बॉय’, प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफ यांची रोमँटिक कॉमेडी ‘Mismatched’, नीना गुप्ता आणि मसाबा गुप्ता स्टारर ‘मसाबा मसाबा’, अमृता सुभाष, पुजा भट्ट आणि शहानो गोस्वामी स्टारर ‘बॉम्बे बेगम्स’ तर स्वरा भास्करची Bhaag Beanie Bhaag या काही ओरिजिनल वेब सीरिज घेऊन नेटफ्लिक्स येत आहे. ‘लुडो’चा फर्स्ट लुक अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) याने ‘लुडो’ या सिनेमाचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. कलाकारांची मांदियाळी असणारा हा सिनेमा ‘नेटफ्लिक्स’(Netflix) वर प्रदर्शित होणार आहे. या मोशन पोस्टरमध्ये फातिमा सना शेख आणि राजकुमार राव हटले स्टाइलमध्ये चालत येताना दिसत आहे, राजकुमारची हेअरस्टाइल काहीशी वेगळी आहे तर झगमगीत ड्रेस घातलेल्या फातिमाच्या कडेवर लहान बाळ आहे. या मोशन पोस्टरनंतर चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

या चित्रपटामध्ये या दोन कलाकारांव्यतिरिक्त अभिषेक बच्चन, पंकज त्रिपाठी, आदित्य रॉय कपूर, सान्या मल्होत्रा आणि आशा नेगी हे कलाकार दिसणार आहेत. ‘बर्फी’फेम अनुराग बासू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट एक अँथॉलॉजी कॉमेडी असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या