JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / "पद्मश्री पुरस्कार काढून घ्या सांगायला तू काय राष्ट्रपती आहेस?" नसिरुद्दीन शाहांनी कंगनाला सुनावलं

"पद्मश्री पुरस्कार काढून घ्या सांगायला तू काय राष्ट्रपती आहेस?" नसिरुद्दीन शाहांनी कंगनाला सुनावलं

काही दिवसांपूर्वीच कंगना रणौतने दिग्दर्शक करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट : अभिनेत्री कंगणा रणौत (kangna ranaut) सातत्याने बॉलिवूडला लक्ष्य केलं आहे. बॉलिवूडमधील अनेकांवर तिने सडसडून टीका केली. काही दिवसांपूर्वीच तिने दिग्दर्शक करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार (karan johar padmashri) काढून घ्यावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. तिच्या या मागणीवरून आता अभिनेते नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. कुणाचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यायला सांगायला तू राष्ट्रपती आहेस का? असे खडेबोल तिला सुनावले आहेत. नसिरुद्दीन शाह यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आपली मतं मांडली. İसुशांतवर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळायला हवाच. मात्र त्याची एक प्रक्रिया असते. त्यात प्रत्येकवेळी आपण पडायलाच हवं असं नाही. कुणाचा पद्मश्री पुरस्कार घ्यायचा आणि कुणाचा नाही हे तिला सांगण्याचा अधिकार नाही. उलट आपल्यापैकी एकाला तिला तिची जागा दाखवण्याची हिंमत आहे", असं नाव न घेता त्यांनी कंगनाला लक्ष्य केलं आहे. लोकमतने याबाबत वृत्त दिलं आहे.

कंगनाने करणचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली होती. याबाबत तिनं ट्वीट केलं होतं,  “करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा, अशी विनंती मी भारत सरकारला करते. त्याने एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बोलताना मी ही इंडस्ट्री सोडून जाण्याबाबत भाष्य केलं होतं. त्याने सुशांतचं करिअर संपवलं, उरी हल्ल्यावेळीही त्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता आणि आता आपल्या भारतीय सैन्याबाबत देशद्रोही फिल्म बनवली आहे” हे वाचा -  हिंदूस्तानी भाऊला Instagram चा दणका! युजर्सच्या तक्रारीनंतर अकाउंट केलं निलंबित कंगनाच्या या ट्वीटनंतर नसिरुद्दीन यांनी आपली प्रतिक्रिया देली आहे, यावर कंगनाने अद्याप उत्तर दिलेलं नाही.

दरम्यान याआधीही नसिरुद्दीन यांनी कंगनाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यावेळी कंगनाने त्यांच्या शिव्यादेखील देवाच्या प्रसादाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या