JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / वयाच्या 13 व्या वर्षी आयुष्यात आलेल्या वादळानं नाना पाटेकरांना शिकवला अभिनय

वयाच्या 13 व्या वर्षी आयुष्यात आलेल्या वादळानं नाना पाटेकरांना शिकवला अभिनय

नानाच्या आयुष्यात वयाच्या 13 वर्षी आलेला एका वादळानं त्यांचं आयुष्यच बदलवून टाकलं. त्याचा हा किस्सा तुम्हाला माहित आहे का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 जानेवारी : बॉलिवूडचे महान अभिनेता नाना पाटेकर यांचा आज 69 वा वाढदिवस. बॉलिवूडमध्ये सध्या त्यांच्या नावला वजन असलं तरीही, आज ते ज्या ठिकाणी आहेत तिथंपर्यंतचा त्यांचा प्रवास अजिबात सोप्पा नव्हता. त्यांच्या पर्सनल लाइफमध्ये त्यांना अनेक संघर्ष करावे लागले. मात्र याविषयी फार कमी लोकांना माहित आहे. अनेकांना नाना खूप वाटतात. कारण ते त्यांचं मत खंबीरपणे मांडतात आणि त्यावर ठाम राहतात. पण बाहेरुन कठोर दिसणाऱ्या नानांचा स्वभाव खरं तर खूपच मृदू आहे. वेळ वाया घालवणं त्यांना आवडत नाही. एखाद्याची काळजी करण्यासोबतच व्यक्तीशी प्रमाणिक राहण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांनी आता राजकारणात सहभाग घेतला असला तरीही त्याच्या कमाईतला बराच पैसा ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत असतात. एका मुलाखतीत त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंब ते बॉलिवूड असा त्यांचा प्रवास कसा झाला याविषयीचा खुलासा केला होता. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या नानाच्या आयुष्यात वयाच्या 13 वर्षी आलेला एका वादळानं त्यांचं आयुष्यच बदलवून टाकलं. नानांच्या वडीलांचा टेक्साटाइल पेंटिंगचा एक छोटसा बिझनेस होता. नाना सांगतात, माझे वडील माझी नाटकं पाहून खूश होत असत. मला सपोर्ट करत असत. त्यांना तमाशा खूप आवडायचा. मग तो सिनेमातला असो वा नाटकातला. मला सुरुवातीला वाटायचं की माझे वडील माझ्या मोठ्या भावावर खूप प्रेम करतात पण जेव्हा ते माझी नाटकं पाहण्यासाठी मुंबईला येत असत त्यावेळी मला जाणावलं की त्यांचं लक्ष स्वतःकडे वळवून घेण्याचा एक खूप चांगला मार्ग आहे. जेव्हा मी 13 वर्षांचा होतो त्यावेळी त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकानं सर्व प्रॉपर्टी बळकावली. Fitness बाबत जागरुक असणाऱ्या तापसी पन्नूच्या दिवसाची ‘अशी’ होते सुरुवात

वयाच्या 13 वर्षी नानांच्या आयुष्यात आलं वादळ नाना सांगतात, मी वयाच्या 13 वर्षापासूनच काम करायला सुरुवात केली होती. शाळा संपल्यावर मी 8 किलोमीटर दूर चुनाभट्टीला जाऊन सिनेमांचे पोस्टर पेंट करण्याचं काम करत असे. ज्यातून मला पैसे मिळत आणि मी दोन वेळचं जेवू शकेन. त्यावेळी मला 35 रुपये महिना मिळत असे. मी नवव्या इयत्तेत असताना मला यशस्वी होण्याच्या भूकेनं एवढं काही शिकवलं की मला कधी अभिनय शिकण्याची गरज पडलीच नाही. मला माझ्या कुटुंबाला सांभाळायचं होतं. कारण माझ्या वडीलांचं सर्व काही गेलं होतं. ते नेहमी म्हणत मुलांचे खाण्याचे दिवस आणि माझ्याकडे काहीच नाही. ते नेहमीच टेन्शनमध्ये असत. जेव्हा मी 28 वर्षांचा झालो त्यावेळी हृदयविकारानं त्यांचं निधन झालं. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंची धर्मेंद्र यांच्याविरोधात कोर्टात धाव

नाना पुढे म्हणाले, मी अलिबाग सारख्या छोट्याशा गावातून आलो होतो. माझ्या शालेय वयापासूनच मी नाटकात काम करत असे. त्यानंतर अप्लाइड आर्टची डीग्री घेतल्यावर मी एक जाहिरात एजन्सीमध्ये काम सुरु केलं. मी स्मिता पाटील यांच्यामुळे सिनेमात आलो. त्या मला पुण्यात असताना पासून ओळखत असत. मला त्यांना नाही म्हणत असतानाही त्यांनी मला रवी चोप्रा यांच्याकडे नेलं. तो सिनेमा होता ‘आज की आवाज’ ज्यात त्यांनी मला खलनायकी बलात्काऱ्याची भूमिका दिली. मी त्याला नकार दिला. स्मितांनी मला विचारल की तू नकार का दिलास. त्यावर ही भूमिका ऑफर करणाऱ्या व्यक्तीला मी शिवी दिली. माझा त्याच्याशी व्यवहार चांगला नव्हता. पण त्यापेक्षा चांगली भूमिका मिळणं शक्य नव्हतं. पण शेवटी त्या भूमिकेनं मला प्रसिद्धी मिळाली आणि माझा बॉलिवूड प्रवास सुरू झाला. धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीने डोक्यात हातोडी घालून Ex Boyfriend ला संपवलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या