JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडमध्ये येण्याआधी मासे विकायची ट्विंकल खन्ना? वाचा काय आहे सत्य

बॉलिवूडमध्ये येण्याआधी मासे विकायची ट्विंकल खन्ना? वाचा काय आहे सत्य

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती नेहमीच कोणत्याही मुद्द्यावर तिची मतं बिनधास्तपणे मांडताना दिसते. यामुळे तिला अनेकदा टीकेलाही सामोरं जावं लागतं. पण यामुळे तिला फारसा फरक पडत नाही. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर बोलताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्विंकल तिच्या अशा स्वभावाविषयी बोलताना म्हणाली, मला सुरुवातीपासून स्पष्ट बोलायला आवडतं. मी त्यावेळी लोक काय म्हणतील किंवा कोणाला काय वाटेल असा विचार करत नाही. माझं मत मी निडरपणे मांडते. इलियाना डिक्रुझनं शेअर केला हॉट बिकिनी फोटो, चाहते म्हणाले…

द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ट्विंकलनं तिच्या करिअर विषयी अनेक खुलासे केले. ती म्हणाली, मी माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा माझ्या आजीसोबत मासे विकण्याचं काम केलं होतं. मी माझ्या जीवनात अनेक नोकऱ्या केल्या. पण कोणत्या एका जागी राहणं मला आवडत नसे. ट्विंकल खन्नानं इंटीरिअर डेकोरेटर म्हणून सुद्धा काम केल आहे. तिनं एका वर्षात एकून 11 प्रोजेक्टवर काम केलं होतं याचा खुलासाही तिनं या मुलाखतीत केला. शाहरुख खानसोबत सिनेमात कधी दिसणार मुलगा अबराम, ट्वीटरवर केला खुलासा

जाहिरात

ट्विंकल पुढे म्हणाली, तुमच्या आयुष्यात एवढं काहीही गंभीर होत नाही ज्याची खिल्ली उडवली जाऊ शकत नाही. मृत्यू देखील याला अपवाद नाही. मी माझ्या विचारांमुळे अनेकदा वादात अडकले आहे. मी कंट्रोल फ्रिक आहे. मला प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीनं करायची सवय आहे. मी सध्या ही सवय कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण मला माहित आहे की हे माझ्यासाठी सोप्पं नाही. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी हॉटेलमध्ये काम करायची ‘ही’ अभिनेत्री ============================================================ मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस, हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या