JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आता 100 रुपयांत चित्रपटाचं तिकीट, मल्टिप्लेक्समधील स्नॅक्सही होणार स्वस्त! हे आहे कारण

आता 100 रुपयांत चित्रपटाचं तिकीट, मल्टिप्लेक्समधील स्नॅक्सही होणार स्वस्त! हे आहे कारण

Multiplex Movie Ticket: यावर्षी अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरवली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 ऑक्टोबर : यावर्षी बॉलीवूड चित्रपटांच्या सततच्या अपयशाने थिएटर मालक, चित्रपट निर्माते आणि वितरकांची चिंता वाढवली आहे. चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे थिएटर चालक आता स्वस्त तिकीट देऊन प्रेक्षकांना भुरळ घालण्याच्या विचारात आहेत. गेल्या महिन्यात राष्ट्रीय सिनेमा दिनी तिकिटांची किंमत 75 रुपये होती. परिणामी 60 लाखांहून अधिक लोक सिनेमागृहात पोहोचले होते. हे यश लक्षात घेऊन स्वस्तात चित्रपटाची तिकिटे देण्याचे नियोजन सुरू आहे. खरेतर, मल्टिप्लेक्समधील सिनेमाच्या तिकिटांची किंमत आता ₹350-450 किंवा त्याहून अधिक आहे, शोच्या वेळेनुसार आणि इतर घटकांवरही ही किमती कमी जास्त होते. चित्रपट व्यापार विश्लेषकांचे म्हणणे आहे की सामान्य ग्राहकांसाठी इतकी महाग तिकिटे खरेदी करणे खूप कठीण आहे. आगामी चित्रपटांसाठी तिकिटे स्वस्त होऊ शकतात थिएटर ऑपरेटर आणि वितरक आगामी चित्रपटांसाठी कमी आणि मध्यम बजेट चित्रपटाची तिकिटे स्वस्त करू शकतात. तसेच संध्याकाळ आणि रात्रीच्या शोची तिकिटे माफक दरात उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्याच वेळी, बहुतेक तरुणांना आकर्षित करण्यासाठी, वीकेंडला देखील अशा ऑफर देण्याची योजना आहे. वाचा - Bigg Boss फेम पवित्रा-एजाजने गुपचूप उरकला साखरपुडा; फोटो झाले VIRAL मल्टिप्लेक्समधील स्नॅक्सची किंमतही कमी होणार त्याच वेळी, थिएटरमध्ये महागड्या स्नॅक्सच्या ग्राहकांच्या तक्रारींनंतर खाद्यपदार्थ आणि पेयांच्या किमतींमध्येही सुधारणा अपेक्षित आहे. प्रयोग म्हणून गेल्या आठवड्यात ब्रह्मास्त्र आणि चुप या चित्रपटांची तिकिटे 100 रुपयांना विकली गेली. आता अजय देवगणचा ‘दृश्यम’ हा चित्रपट 2 नोव्हेंबरला रिलीज होत आहे आणि त्यासाठी 2 ऑक्टोबरपासून ओपनिंग डे तिकिटांवर 50% सूट देण्यात आली आहे. अमिताभ बच्चन स्टारर गुडबाय हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाचे 150 रुपयांना तिकीट मिळत आहे.

आयनॉक्स लीझरचे मुख्य प्रोग्रामिंग ऑफिसर राजेंद्र सिंह ज्याला म्हणाले, “आम्ही थोडा वेळ घेऊ आणि तिकिटांच्या किमती कमी झाल्यावर सिनेमामध्ये प्रेक्षकांची संख्या प्रत्यक्षात वाढतेय का याचे विश्लेषण करू. वास्तविक, मोठ्या बजेटच्या चित्रपटांसाठी हे करणे शक्य नाही. कारण तिकिटांचे दर खूपच कमी असताना ते त्यांचा खर्च वसूल करू शकत नाहीत. ऑक्टोबरमध्ये येणार्‍या छोट्या चित्रपटांना तिकिटांच्या कमी किमतीचा नक्कीच फायदा होऊ शकतो."

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या