मुंबई, 6 सप्टेंबर: कॉमेडियन राजू श्रीवास्तव (raju srivastav Health Update) सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं होतं. तेव्हापासून त्यांच्याविषयी वेगवेगळी हेल्थ अपडेट समोर येत आहे. अशातच त्यांच्याविषयी नवी माहिती समोर येत आहे. राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करून 25 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. त्यांचे चाहते ते ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. आता त्यांच्या प्रकृतीविषयी दिलासादायक माहिती समोर आलीये. इंडो युरोपियन हेल्थ केअरचे डॉ. चिन्मय गुप्ता यांनी सांगितलं की, ‘राजू यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या शरीरात काही हालचाल सुरू होती. खरं तर, त्यांनी पाय हलवण्याचा थोडासा प्रयत्न केला होता. मात्र, ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहे. त्यांना त्यांच्या आरोग्याबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही किंवा घाईही करायची नाही’, असं टीव्ही 9 हिंदीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हेही वाचा - Cyrus Mistry : दिवंगत उद्योजक सायरस मिस्त्रींचे आजोबा होते चित्रपटांचे शौकीन, ‘मुघल-ए-आझम’साठी खर्च केले होते कोटी रुपये काही दिवसांपूर्वी राजू श्रीवा्स्तव यांची मुलगी अंतरा श्रीवास्तव हिला डॉक्टरांनी वडिलांना भेटण्यास परवानगी दिली होती. ज्याची माहिती अंतरानेही ट्विटद्वारे दिली होती. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी चाहते आणि कुटुंबीय चिंतेत आहेत. ते लवकर ठणठणीत बरे व्हावे याची प्रार्थना करतायेत. दरम्यान, आदल्या दिवशी योगी सरकारने राजू श्रीवास्तव यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मोठी कारवाई केली. गी सरकारने राजू यांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी निवासी आयुक्तांवर सोपवली आहे. त्यानंतर आता त्यांची प्रकृती आणि उपचार निवासी आयुक्तांच्या अधिपत्याखाली होत आहेत.